जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मोबाईल ब्राउझरने दिलेल्या अपडेटमुळे अँड्रॉइड यूजर्सच्या अडचणी वाढल्या आहेत. वास्तविक, जर अँड्रॉइड यूजर्स जुन्या व्हर्जनवर चालणारे स्मार्टफोन वापरत असतील तर त्यांना त्यांचा फोन बदलावा लागेल. कारण, आता या अँड्रॉईड मोबाईलमध्ये गुगल क्रोम वापरता येणार नाही.
खरंतर, गुगल क्रोमने अँड्रॉइड नौगटच्या जुन्या आवृत्तीचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ Android ७.० आणि Android ७.१ वर आधारित फोन वापरणारे वापरकर्ते यापुढे Google Chrome वापरू शकणार नाहीत.
(हे ही वाचा : आजपासून Facebook अन् Instagram वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे; आता किती खर्च करावा लागेल? )
हा बदल Google Chrome १२० रिलीझ झाल्यानंतर लागू होईल, जो ६ डिसेंबर रोजी स्थिर रिलीझ चॅनेलला हिट करेल आणि Chrome ची नवीनतम आवृत्ती असेल. गुगलने जुन्या वापरकर्त्यांसाठी आपल्या ब्राउझरचा सपोर्ट समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून नवीन आवृत्तीवर अधिक आणि चांगले लक्ष केंद्रित करता येईल.
तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की, Android ७.० किंवा Android ७.१ सह वापरले जाणारे स्मार्टफोन आणि उपकरणे खूप कमी आहेत. एकूण वापरकर्त्यांपैकी केवळ २.६ टक्के वापरकर्ते या बदलामुळे प्रभावित होऊ शकतात.
२००८ मध्ये लॉन्च झाल्यानंतर, गुगल क्रोम गेल्या १५ वर्षांत जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर बनला आहे. याशिवाय, इतर अनेक ब्राउझर त्याच्या क्रोमियम इंजिनवर देखील कार्य करतात.