एक्स (पूर्वीचे ट्विटर) हे एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. एक्सचे प्रमुख एलॉन मस्क आहे. एक्स कंपनीने IT २०२१ च्या नियमाचे पालन करून ५,५७,७६४ भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. एक्स ने ही कारवाई २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीत केली आहे. याबद्दलची माहिती कंपनीने दिली आहे. प्रामुख्याने बंदी घालण्यात आलेल्या अकाउंट्समध्ये बालकांचे लैंगिक शोषण आणि भावना उद्दीपित करणाऱ्या साहित्याचा (पॉर्न) परवानगीविना प्रसार करणाऱ्या एक्स अकाउंट्सचा समावेश आहे.

काही कालावधी आधी एलॉन मस्क यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) चे सीईओ पद सोडले होते. आता लिंडा याकारिनो या एक्सच्या सीईओ आहेत. तसेच मास्क यांनी कंपनीचा लोगो देखील बदलला आहे. या मायक्रो ब्लॉगिंफ प्लॅटफॉर्म असणाऱ्या एक्सने दशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल १,६७५ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. या बाबतचे वृत्त economictimes ने दिले आहे.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

हेही वाचा : WhatsAppने एप्रिलमध्ये ७४ लाख भारतीय अकाउंट्स केले बॅन! तुम्ही करत नाही ना ही चूक?

म्हणजेच एक्स ने एकूण २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीमध्ये ५,५९,४३९ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. एक्स ने नवीन आयटी नियम २०२१ चे पालन करत आपल्या मासिक अहवालामध्ये म्हटले आहे की, भारतातील वापरकर्त्यांकडून कंपनीला एकूण ३,०७६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच वापरकर्त्यांना ११६ अकाउंट्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आम्ही सगळी तपासणी केल्यानंतर ११६ पैकी १० अकाउंटवरील बंदी उठवली असून उर्वरित अकाउंटवरील बंदी कायम ठेवली आहे.

”आम्हाला या कालावधीमध्ये एक्स अकाउंटशी संबंधित प्रश्नांच्या १३ विनंत्या प्राप्त झाल्या.” यात भारतात प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये अत्याचार/छळ (१,०७६), द्वेषपूर्ण वर्तन (१,०६३) आणि बाल लैंगिक शोषण (४५०) व संवेदनशील कंटेंट (३३२) चा समावेश होता. असे कंपनीने सांगितले. तसेच एक्स कंपनीने २६ जुलै ते २५ ऑगस्ट दरम्यान १२,८०,१०७ अकाउंट्सवर बंदी घातली होती.