Xiaomi 13 Series Features Specification and Design: शाओमीने अधिकृतपणे त्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉंच केले आहेत. लॉंच करण्यात आलेल्या शाओमी १३ आणि शाओमी १३ प्रोची डिझाइन ही आयफोनशी जवळीक साधणारी आहे. तर शाओमी १३ आणि शाओमी १३ प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर चिपसेट देण्यात आला आहे. नवीन Xiaomi ला आयफोनसारखी डिझाइन करण्यात आली असून त्याचा कॅमेऱ्यातही सुधारित बदल करण्यात आला आहे.
ही दोन्ही मॉडेल्स MIUI 14 आणि Android 13 OS वर आधारित आहेत. या मोबाईलचे पाणी आणि धूळीपासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंग सारखी फिचर्सही देण्यात आली आहेत. यासह डॉल्बी अॅटमॉससह स्टिरिओ स्पीकर सेटअपही देण्यात आला आहे.
हेही वाचा- एका चार्जवर ७ दिवस चालणार, ब्लूटूथ कॉलिंगसह लाँच झाली COLORFIT LOOP SMARTWATCH, किंमत केवळ..
Xiaomi 13 Pro हा अनेक रंगामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये काळा, हिरवा, पांढरा, यासह लाइट निळ्या रंगामध्येही उपलब्ध आहे. तर Xiaomi 13 ही काळा, लाइट हिरवा, लाइट निळा, ग्रे, पांढरा, लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर शाओमीने लॉंच केलेल्या या मोबाईलमध्ये काय काय फिचर्स दिली आहेत ती जाणून घेऊयात.
शाओमी १३ प्रो फिचर्स –
शाओमी १३ प्रो हा लेटेस्ट आणि प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये ६.७३ इंचाचा AMOLED डिस्प्ले, 1440p रिझोल्यूशनसह (3200x1440p) 120Hz रिफ्रेश रेट आहे. तसंच अॅम्बियंट कलर टेंपरेचर सेन्सर देखील आहे जो बाहेरच्या वातावरणानुसार मोबाईल स्क्रीनचा आपोआप रंग बदलेल.
Xiaomi 13 Pro चा डिस्प्ले 1900 nits च्या पीक ब्राइटनेस जो HDR १० मोडसा सुरु होतो. तर सामान्य स्थितीत ही डिस्प्ले १२०० nits पीकपर्यंत ब्राइटनेस देऊ शकतो. हा डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरवर आधारित आहे. तर या फोनमध्ये 8/12GB LPDDR5x RAM आणि 128/512GB UFS 4.0 आधारित अंतर्गत स्टोरेज आहे.