Xiaomi 13 series launch : बहुप्रतीक्षित शाओमी १३ सिरीजबाबत अनेक लिक, अफवा इंटरनेटवर पुढे आल्या होत्या. या फोनमध्ये नेमके कोणते भन्नाट फीचर्स मिळतील याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. आता हे गुपित लवकरच उघड होणार आहे. १ डिसेंबरला शाओमी १३ सिरीज चीनमध्ये लाँच होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. या सिरीजमध्ये vanilla Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. स्मार्टफोनबरोबरच एमआययूआय १४ आणि शाओमी बड्स ४ देखील लाँच होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिरीजमध्ये दोन फोन असणार. शाओमी १३ मॉडेलमध्ये सपाट पॅनल असेल, तर शाओमी १३ प्रो स्मार्टफोनमध्ये वक्र डिस्प्ले असेल. वॅनिला शाओमी १३ मध्ये ओएलईडी पॅनल आणि १.६१ एमएम थिक नॅरो बेझेल मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मेटल फ्रेम मिळण्याची शक्यता आहे.

(WHATSAPP DATA LEAK : 50 कोटी युजर्सचा डेटा ‘ON SALE’; यात तुम्ही तर नाही ना? असे तपासा)

शाओमी १३ स्मार्टफोनचे फीचर

Xiaomi 13 स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच २ के अमोलेड डिस्प्ले, नवीन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ५० एमपी सोनी आयएमएक्स ८ सिरीज रिअर कॅमेरा सेन्सर आणि ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. त्याचबरोबर, फोनमध्ये ४ हजार ७०० एमएएचची बॅटरी मिळणार असल्याचे सांगितल्या जाते जी १२० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.