Xiaomi 15 Series Features And Price : आपण मोबाईल खरेदी करताना सगळ्यात पहिल्यांदा फोनचा कॅमेरा कसा आहे हे बघतो. बजेट आयफोन घेण्याइतके नसले तरीही आपल्याही मोबाईलचा कॅमेरा अगदी आयफोनसारखाच भारी फोटो येणारा हवा, अशी मात्र सगळ्यांची इच्छा असते. तर तुम्हीही अशाच फोनच्या शोधात असाल, तर शाओमी कंपनी तुमची इच्छा पूर्ण करील, असे म्हणायला हरकत नाही.

शाओमीने बार्सिलोना आणि भारतातील एका कार्यक्रमात शाओमी १५ (Xiaomi 15) आणि शाओमी १५ अल्ट्रा (Xiaomi 15 Ultra) या आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. नवीन सीरिजमध्ये जबरदस्त फोटोग्राफी (top-tier photography), एआय फीचर्स व पॉवरफूल परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाओमी १५ अल्ट्रा (Xiaomi 15 Ultra) Leica-inspired aesthetics सह फोटोग्राफीसाठी उत्साही असणाऱ्या लोकांकरिता डिझाइन करण्यात आला आहे. तर शाओमी १५ कॉम्पॅक्ट हाय-परफॉर्मन्स पर्याय ऑफर करतो. दोन्ही फोन Xiaomi च्या नवीन HyperOS 2 वर चालतात आणि त्यामध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असणार आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोनची भारतातील किंमत किती आणि ते कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार याची माहिती ११ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल, तर आपण आधी त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊ…

किंमत :

१२ जीबी प्लस २५६ जीबी शाओमी १५ ची किंमत EUR 999 पासून सुरू होते, तर १६ जीबी प्लस ५१२ जीबी शाओमी १५ अल्ट्राची मॉडेलची किंमत EUR 1499 आहे. अल्ट्रा मॉडेलसाठी वेगळे फोटोग्राफी किट EUR 199 मध्ये उपलब्ध आहे.

फीचर्स :

शाओमी १५ अल्ट्रामध्ये एरोस्पेस ग्रेड ग्लास फायबर आणि PU लेदरसह प्रीमियम सिल्व्हर क्रोम फिनिश असणार आहे. तसेच यामध्ये ६.७३ इंचांचा WQHD+ AMOLED डिस्प्ले, ज्याची ब्राइटनेस 3200 nits आहे. क्वाड-कॅमेरा सेटअपमध्ये ५० एमपी १ इंच सोनी सेन्सर, 70mm Leica टेलीफोटो लेन्स, 200MP सेन्सरसह 100mm अल्ट्रा-टेलिफोटो लेन्स आणि 14mm अल्ट्रा वाइड कॅमेरा यांचा समावेश असणार आहे. हे 120fps वर 4K स्लो-मोशन, 60fps वर डॉल्बी व्हिजन 4K आणि ॲडव्हान्स स्टॅबिलायजेशन १० बिट लॉग व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते. 5410mAh बॅटरी 90W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

शाओमी १५ मध्ये ब्राइटनेससह एक लहान ६.३६ इंचांचा CrystalRes AMOLED डिस्प्ले दिला आहे. शाओमी १५ काळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगात उपलब्ध आहे. तसेच यामध्ये ५० एमपी मेन सेन्सर, 60mm Leica टेलिफोटो कॅमेरा व 14mm अल्ट्रा-वाइड कॅमेरा असे ट्रिपल कॅमेरे असणार आहेत. ते 30fps वर 8K व्हिडीओ आणि 60fps वर डॉल्बी व्हिजन 4K ला सपोर्ट करतात. स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, LPDDR5X रॅम व UFS 4.0 स्टोरेजसह फास्ट परफॉर्मन्स देते. तसेच त्याची 5240mAh बॅटरी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

एआय फीचर्स :

दोन्ही मॉडेल्समध्ये हायपरओएस २ सह एआय लेखन (AI Writing), एआय स्पीच रेकग्निशन व एआय इमेज एन्हान्समेंट यासारखी एआय फीचर्ससुद्धा असणार आहेत. शाओमीचे HyperConnect फीचर macOS आणि iOS सह सर्व डिव्हायसेसवर फाइल ट्रान्स्फर करण्यास अनुमती देण्यात आली आहे. ॲडव्हान्स कॅमेरे, एआय driven अपग्रेड व पॉवरफूल हार्डवेअरसह Xiaomi 15 सीरिज प्रीमियम स्मार्टफोन अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवते. आता हा फोन भारतात कधी लाँच होणार याची उत्सुकता ग्राहकांमध्ये दिसून येईल.

Story img Loader