Xiaomi ने नवीन २-इन-१ लॅपटॉप ‘Xiaomi Book Air 13’ लाँच केला आहे. कंपनी याला आतापर्यंतचा सर्वात सर्वात पातळ आणि हलका लॅपटॉप असल्याचा दावा करत आहे. कंपनीने हा लॅपटॉप नुकताच चीनमध्ये सादर केला असून येत्या काही दिवसांत हा लॅपटॉप भारतातही सादर केला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Xiaomi Book Air 13 ची वैशिष्ट्ये
या लॅपटॉपमध्ये ३६०-डिग्री बिजागर आहे. यासोबतच कंपनी यामध्ये टच सपोर्ट देखील देत आहे, ज्यामुळे हा लॅपटॉप वापरण्याचा अनुभव खूप उत्तम होणार आहे. लॅपटॉपमध्ये कंपनी २८८०x१८०० पिक्सेल रिझोल्यूशनसह १३.३-इंच लांबीचा E4 OLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले ६०० nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हल आणि ६०Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले कॉलिटीसाठी कंपनी त्यात डॉल्बी व्हिजन आणि VESA डिस्प्ले देत आहे. लॅपटॉपच्या थिन बेझल्समुळे ते खूप प्रीमियम दिसते.

आणखी वाचा : लवकरच बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतोय सॅमसंगचा ‘हा’ नवा स्मार्टफोन; दमदार बॅटरीसह मिळतील जबरदस्त फीचर्स…

Xiaomi Book Air 13 बॅटरी

१.२ किलो वजनाच्या, या लॅपटॉपमध्ये १६ जीबी पर्यंत LPDDR5 RAM आणि ५१२ जीबी एसएतडी स्टोरेज आहे. Intel Iris Xe GPU ने सुसज्ज असलेल्या या लॅपटॉपमध्ये 12th Generation Intel Core i7 पर्यंत प्रोसेसर पर्याय आहे. लॅपटॉपमध्ये कंपनी ड्युअल युनिट मायक्रोफोनसह मजबूत ऑडिओसाठी ड्युअल स्पीकर सिस्टम ऑफर करत आहे, जे डॉल्बी ATMOS साउंडला समर्थन देते. Xiaomi चा हा नवीनतम लॅपटॉप बॅकलिट कीबोर्ड आणि ग्लास टचपॅडसह येतो. याशिवाय पॉवर बटनमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. कॉलिंगसाठी कंपनी लॅपटॉपमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा देत आहे. लॅपटॉपमध्ये दिलेली बॅटरी ५८.३WHr आहे, जी ६५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi Book Air 13 किंमत

Xiaomi च्या या लॅपटॉपच्या Core i5 वेरिएंटची किंमत ४,९९९ युआन म्हणजेच सुमारे ५७ हजार रुपये आहे आणि Core i7 व्हेरिएंटची किंमत जवळपास ६३,८०० रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi book air 13 laptop launched pdb
Show comments