Xiaomi Holi Sale Offer On Redmi Note 13 Pro : विविध सणानिमित्त नवनवीन वस्तू खरेदी करण्याची आपल्याकडे जणू परंपराच आहे. त्यामुळे अनेक कंपन्या हे लक्षात ठेवून विविध सणानिमित्त खास ऑफर्स, आकर्षक डिस्काउंट ग्राहकांना देत असतात. तर आता होळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान शाओमी (Xiaomi Holi Sale) कंपनी त्यांच्या काही स्मार्टफोन्सवर सूट देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर नवीन लाँच केलेल्या रेडमी नोट १४ (Redmi Note 14) पासून ते गेल्या वर्षीच्या रेडमी नोट १३ प्रो (Redmi Note 13 Pro) पर्यंत, ज्यात २०० एमपी कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट (Xiaomi Holi Sale) देण्यात आली आहे. तुम्ही उत्तम फीचर्सनी भरलेल्या बजेट-फ्रेंडली ५ जी फोनच्या शोधात असाल तर शाओमीचे फोन स्वस्तात विकत घेण्याची ही उत्तम संधी आहे. या जाहिरातीदरम्यान कंपनी रेडमी १३ सी ४ (Redmi 13C 4G) सारख्या परवडणाऱ्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या ऑफर्स देत आहे.

रेडमी नोट १४ ५ जी (Redmi Note 14 5G)

हा नवीन स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची तुमच्याकडे संधी (Xiaomi Holi Sale) चालून आली आहे, ज्याची मूळ किंमत १८,९९९ रुपये आहे. पण, या स्मार्टफोनचा ६ जीबी प्लस आणि १२८ जीबी व्हेरियंट तुम्ही फक्त १७ हजार ९९९ मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट, खरेदीवर एक्स्चेंज ऑफर आणि इतर सवलतींचासुद्धा लाभ घेऊ शकता.

रेडमी नोट १३ सी, ४जी (Redmi Note 13C 4G)

हा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन तुम्हाला Xiaomi Holi Sale मध्ये सात हजार ९९९ रुपयांच्या आकर्षक किमतीत मिळू शकतो. तसेच यामध्ये तुम्हाला ५०० रुपयांची सवलतदेखील मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि robust 5000mAh बॅटरी, ६.७४ इंचाचा डिस्प्लेसुद्धा देण्यात आला आहे.

रेडमी नोट १३ प्रो ५जी (Redmi Note 13 Pro 5G)

Xiaomi Holi सेलमध्ये तुम्हाला कमी किमतीत २०० एमपी कॅमेराचा Redmi Note 13 Pro घेऊ शकता, त्यामध्ये १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी व्हेरिएंट Amazon वर फक्त १८,६५९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तसेच यामध्ये तुम्हाला १००० रुपयांची बँक सवलतदेखील मिळेल; तर फ्लिपकार्टवर हा व्हेरिएंट ग्राहकांना २१ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात इतर विविध ऑफर, ज्यामध्ये एक्स्चेंज पर्याय आहेत, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पर्यायदेखील उपलब्ध आहेत.