Xiaomi India एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन गॅजेट्स लॉन्च करत असते. शाओमी इंडिया कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शाओमी इंडिया काही कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारांनी कमी करण्याचा विचार करत आहे. द इकॉनॉमिक टाईम्सनुसार, गेल्या दोन आर्थिक तिमाहींमध्ये भारतातील मोबाइल मार्केट शेअरमध्ये घसरण झाल्यानंतर कंपनी टीमची पुनर्रचना करण्याचा विचार करत आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले, गेल्या काही आठवड्यांमध्ये शाओमी इंडियामध्ये जवळजवळ ३० कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर आणखी काही जणांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. शाओमी इंडियामध्ये २०२३ च्या सुरुवातीला १,४०० ते १,५०० कर्मचारी होते. शाओमीच्या प्रवक्त्याचा हवाला देत रिपोर्टमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, कर्मचाऱ्यांच्या संख्येचा निर्णय हा व्यावसायिक दृष्टिकोनावर आधारित आहे आणि ”स्थानिक भारतीय नेतृत्वाला सशक्त करण्यात आले आहे.” रिपोर्टमध्ये सांगण्यात आले ,”कोणत्याही कंपनीप्रमाणे आम्ही बाजारातील स्थिती आणि व्यावसायिक अंदाजावर आधारावर कर्मचाऱ्यांच्या संख्यबाबत निर्णय घेतला जातो.”

Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Meta to lay off 3600 employees
Meta to Lay Off : मेटा ३६०० कर्मचार्‍यांना देणार नारळ! मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं कारण
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
Laurene Powell Jobs in Mahakumbh
Laurene Powell Jobs: स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांना काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग शिवू दिले नाही; कारण काय?
buldhana government jobs scam
शासकीय नोकरी घोटाळा : बुलढाण्यात बनावट मंत्रालयीन शिक्के, नियुक्तीपत्रे अन् बरेच काही…
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी

हेही वाचा : Nokia ने लॉन्च केला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; घरीच करता येणार दुरुस्त, जाणून घ्या

रिपोर्ट सूचित करतो की, तात्काळ टाळेबंदी होऊ शकत नाही. कारण लीडरशिप टीमवर जे कर्मचारी कामामधील कंपनीच्या पेक्षा पूर्ण करत नाहीत असे कर्मचारी ओळखण्याचा दबाव आहे. कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या मूल्यांकनावर अवलंबून असेल. याशिवाय, विविध कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या बाजारातील घटत्या भागीदारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यासाठीच अंतर्गत संस्थात्मक मुद्दे आणि महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार चिनी मुख्यालयात केंद्रीकृत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला शाओमीचे ग्लोबल VP मनु कुमार जैन यांनी नऊ वर्षानंतर कंपनी सोडली.

दरम्यान, काउंटरपॉईंट डेटाच्या माध्यमातून असे माहिती होते की, शाओमी इंडियाची बाजारातील स्थिती दोन तिमाहीमध्ये पहिल्यापासूनच तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. संशोधनानुसार, ३० सप्टेंबरला संपणारी २०२२ मधील तिसऱ्या तिमाहीमध्ये शाओमी भारताची बाजार हिस्सा २१ टक्के होता. यानंतर सॅमसंग १९ टक्के आणि विवो १४ टक्के इतका होता. तथापि पुढील दोन तिमाहीमध्ये सॅमसंग २० टक्के शेअरसह आघाडी घेतली. तर यामध्ये विवो आणि शाओमीचा हिस्सा १८ टक्के इतका होता. गेल्या तिमाहीमध्ये सॅमसंगने २० टक्के शेअरसह आपले स्टेषन कायम राखले. त्यानंतर १७ टक्क्यांसह विवो आणि १६ टक्क्यांसह शाओमीने आपले स्थान राखले. OnePlus आणि iQOO सारख्या अधिक प्रतिस्पर्ध्यांनी सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याच्या Redmi Note सीरिजच्या लोकप्रियतेमध्ये घसरण होऊ शकते असे विश्लेषकांनी सुचवले आहे.

हेही वाचा : Jio, Airtel आणि Vi चे ‘हे’ आहेत एंट्री लेव्हल पोस्टपेड प्लॅन्स, मिळणारे फायदे एकदा पहाच

डिसेंबर २०२२ मध्ये शाओमीने त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केल्याची पुष्टी केली. कंपनीने सांगितले की टाळेबंदी ही, ”नियमित कर्मचारी प्टिमायझेशन आणि संस्थात्मक सुव्यवस्थित” चा भाग होता आणि प्रभावित कामगारांना स्थानिक नियमांचे पालन करून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

Story img Loader