सध्या सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वातावरण आहे. सकाळी १० च्या नंतर रस्त्यावर चालताना सुद्धा उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. मात्र अजून खरा उन्हाळा चालू होयचा आहे असे म्हणायला हरकत नाही. एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारे ऊन फेब्रुवारी माहीन्याच्या शेवटी जाणवत आहे. मात्र या उन्हाळाच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक घरामध्ये AC , Cooler अशी साधने बसवतात. ज्यापासून तुम्हाला गार वारा मिळतो आणि कडक उन्हापासून दिलासा मिळतो.
एप्रिल मे महिन्याच्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी लोकांनी आतापासूनच एसी, कूलर खरेदी करण्यावर भर दिला आहे. Xiaomi ने चीनमध्ये त्यांच्या MIJIA ब्रँड अंतर्गत आणखी एक नवीन एअर कंडिशनर (AC) लॉन्च केला आहे. हा एसी सध्या सध्या डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. चिनी बाजारपेठांमधील इतर अनेक यशस्वी MIJIA AC च्या लिस्टमध्ये हा AC समाविष्ट होतो. Xiaomi ने लॉन्च केलेल्या AC ची किंमत त्याचे फीचर्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शाओमी कंपनीने चीनमध्ये MIJIA Air Conditioner 3HP Gold Edition लॉन्च केला असून या बद्दल कंपनीने हा एसी दरवर्षी ४८९ kwh इतकी वीज वाचवतो असा कंपनीने दावा केला आहे. Xiaomi Meijia एअर कंडिशनरच्या नवीन गोल्ड-प्लेटेड सिरीजमध्ये बाहेरील डिझाईन सध्या प्रकारचे आहे. मात्र आधीच्या Meijia AC ची झलक यामध्ये दिसते. हा एसी गोल्ड प्लेटेड डिझाईनमुळे दिसायला आकर्षक आहे. हा एसी इंटेलिजंट कंट्रोलसह येतो. स्मार्टफोन अॅपसोबतच या एसीमध्ये व्हॉइस कमांडमध्ये कंट्रोल सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा एसी लाईट्स, दरवाजावरील कुलूप , व्हॅक्युम रोबोट आणि इतर स्मार्ट गॅजेट्सशी कनेक्ट केला जाऊ शकतो.
MIJIA एसी 3HP गोल्ड एडिशनमध्ये फुल डीसी फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जन सिस्टीम देण्यात आली आहे. चीनमध्ये लॉन्च झालेल्या या एसीमध्ये वीज बचतीसाठी काही फीचर्स देण्यात आली आहेत. यामुळे हा एसी दरवर्षी ४८९ kwh पर्यंत विजेची बचत करू शकतो. नवीन एसीमध्ये विंड मोड हा सध्याच्या लेव्हल ३ एसीपेक्षा अधिक प्रभावी आहे. हे canopy mode, carpet wind आणि surround wind मोडला सपोर्ट करते.
नवीन Xiaomi MIJIA एअर कंडिशनर 3HP गोल्ड एडिशन तापमान आणि आद्रता या दोन्ही कंट्रोलसह येतो. जे स्वयंचलित स्वरूपाचे आहे. हा एसी शाओमी कंपनीने चीनमध्ये ऑफर अंतर्गत ३,९९९ युआन (सुमारे ४७,७००रुपये ) मध्ये उपलब्ध करून दिला आहे. लॉन्चिंग ऑर संपली की याची किंमत ही ४,२९९ युआन (सुमारे ५१,२०० रुपये ) इतकी असणार आहे.