Xiaomi ने भारतात आपला नवीन टॅबलेट लॉन्च केला आहे. शाओमीने Pad 6 हा टॅबलेट लॉन्च केला आहे. यामध्ये डिस्प्लेला १४४ Hz इतका रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच कंपनीने भारतात Redmi Buds 4 Active TWS earbuds देखील लॉन्च केले आहेत. हे इअरबड्स एकदा चार्ज केले त्याची बॅटरी ३० तासांपर्यंत टिकते. तसेच हे पर्यावरणीय Noise Cancellation (ENC) सपोर्टसह येतात.
किंमत, सेल आणि ऑफर्स
Xiaomi Pad 6 हे कंपनीने दोन स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. ६/१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही २६,९९९ रुपये आणि ८/२५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २८,९९९ रुपये असणार आहे. Xiaomi Pad 6 कीबोर्डची किंमत ४,९९९ रुपये असणार आहे. तसेच हे २१ जूनपासून भरता खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. केस लॉन्च करण्यात आली असून त्याची किंमत १,४९९ रुपये आणि शाओमीच्या स्मार्ट पेनची किंमत ५,९९९ रुपये असणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : आता धावता धावतादेखील अटेंड करू शकता मीटिंग, गूगल Meet मध्ये लवकरच आणणार ‘हे’ भन्नाट फिचर
ग्राहकांना हे Chick Mystic Blue आणि Classic Graphite Grey या रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. शाओमी पॅड ६ खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केली असता ३,००० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळणार आहे. यामुळे ६ जीबी व ८ जीबी व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे २३,९९९आणि २५,९९९ रुपये होणार आहे. हा टॅबलेट भारतात २१ जून पासून Amazon.in आणि Mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा : iPhone आणि Android डिव्हाईसवर वेदर अलर्टस कसे मिळवायचे ? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
Xiaomi Pad 6 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Pad 6 मध्ये ११ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जायचा रिफ्रेश रेट हा १४४ HZ इतका आहे. हा डिस्प्ले HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनच्या स्पोर्टसह येतो. सेफ्टीसाठी यामध्ये टॅबलेट कॉर्निंग गोरिला ग्लास ३ देण्यात आली आहे. हा पॅड ६ स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटद्वारे समर्थित आहे. यामध्ये ८/२५६ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वाड-स्पीकर सिस्टीम देखील बघायला मिळते. शाओमी पॅड ६ मध्ये ८८४० mAh क्षमतेची बॅटरी आणि ३३ W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे हे १५० तासांपर्यंत स्टॅण्डबाय बॅटरी लाईफ ऑर करते.