xiaomi कंपनीने आज भारतात आपले काही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत. त्यामध्ये कंपनीने Xiaomi Pad 6 आणि रेडमी Buds 4 Active TWS earbuds लॉन्च केले आहे. त्यापैकी Buds 4 Active TWS earbuds याचे फीचर्स किंमत याबद्दल जाणून घेऊयात. तसेच Xiaomi ने भारतात आपला नवीन टॅबलेट लॉन्च केला आहे. शाओमीने Pad 6 हा टॅबलेट लॉन्च केला आहे. यामध्ये डिस्प्लेला १४४ Hz इतका रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने भारतात Redmi Buds 4 Active TWS earbuds देखील लॉन्च केले आहेत. हे इअरबड्स एकदा चार्ज केले त्याची बॅटरी ३० तासांपर्यंत टिकते. तसेच हे पर्यावरणीय Noise Cancellation (ENC) सपोर्टसह येतात. याबाबतचे वृत्त business today ने दिले आहे.
रेडमी Buds 4 Active TWS इअरबड्सचे फीचर्स
रेडमी Buds 4 Active TWS इअरबड्स १२ एमएम ड्रायव्हर्स आणि पर्यावरणीय Noise Cancellation (ENC) सपोर्टसह येतात.हे इअरबड्स ब्लूटूथ ५.३ आणि गूगल फास्ट पेटला सपोर्ट करतात. रेडमीचे लॉन्च झालेले हे नवीन इअरबड्स लो-लेटेंसी गेमिंग मोडसाठी सपोर्ट करतात. Redmi Buds 4 Active इअरबड्स एकदा चार्ज केला की त्याची बॅटरी ३० तासांपर्यंत टिकते. हे इअरबड्स टाईप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. यातील एका इअरबड्सचे वजन हे ३.६ ग्रॅम इतके आहे. तर केसचे वजन हे ४१.२ ग्रॅम इतके आहे.
रेडमी Buds 4 Active TWS ची किंमत
रेडमी Buds 4 Active TWS इअरबड्स कंपनीने १,३९९ रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ऑफरमध्ये भारतात हा १,१९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना हे इअरबड्स हे बास Black आणि एअर White या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. हे इअरबड्स २० जूनपासून Amazon.in आणि mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.