Reliance Jio ही कंपनी आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन्स आणत असते. तसेच या कंपनीची ५ जी सेवा देशांतील १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये सुरु झाली आहे. या सेवेचा उपयोग करून घेण्यासाठी युजर्सकडे ५जी सपोर्ट असणारा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. यामुळे Samsung, Realme, Xiaomi आणि अन्य कंपन्यांनी आपले स्मार्टफोन हे ५जी ला सपोर्ट करतील अशाच प्रकारे तयार केले आहेत.
टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार , Xiaomi कंपनीचे दोन स्मार्टफोन्स हे जिओ ५जी ला सपोर्ट करणार नाहीत. Xiaomi Mi 10 आणि Mi 10i हे ते दोन स्मार्टफोन्स आहेत. हे दोन्ही डिव्हाईस ५जी स्टॅन्डअलोन आणि ५जी SA याला सपोर्ट करत नाहीत. मात्र या दोन्ही फोनला Airtel 5G सपोर्ट करते.
हेही वाचा : Google ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; दंड भरण्याचे दिले आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?
शाओमी कंपनीने Mi 10 व MI 10i हे दोन स्मार्टफोन्स अनुक्रमे २०२० व २०२१ मध्ये लाँच केले होते. Mi 10 या हॅंडसेटची भारतातील किंमत ही ३१,९९९ रुपये इतकी आहे तर Mi 10i ची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे.
Jio 5G ला सपोर्ट करणाऱ्या Xiaomi च्या फोन्सची यादी
१. Mi 11 Ultra 5G
२. Xiaomi 12 Pro 5G
३. Xiaomi 11T Pro 5G
४. Redmi Note 11 Pro 5G
५. Xiaomi 11 Lite NE 5G
६. Redmi Note 11T 5G
७. Redmi 11 Prime 5G
८. Redmi Note 10T 5G
९. Mi 11X 5G
१०. Mi 11X Pro 5G
११. Redmi K50i 5G
१२. Xiaomi 11i 5G
१३. Xiaomi 11i HyperCharge 5G.