स्मार्टफोन आणि लॅपटॉप या दोन्हींचे मिश्रण असलेले डिव्हाईस शोधणाऱ्या लाखो विदयार्थी आणि व्यावसायिकांसाठी लॉकडाऊन दरम्यान टॅबलेट कॉम्पुटरने पुनरागमन केले. त्यावेळी जगभरामध्ये टॅब्लेटची शिपमेंट ही खूप मोठ्या प्रमाणावर होती. तसेच अनेक स्मार्टफोन ब्रँड्सना टॅबलेट क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी प्रोत्साहित केले होते. आज आपण ३० हजार रुपयांमध्ये कोणते बेस्ट टॅबलेट खरेदी करू शकता हे जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजच्या काळामध्ये तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये टॅबलेट खरेदी करू शकता. मात्र जर का तुम्ही चांगले प्रदर्शन करणारा टॅबलेट शोधात असाल तर तुम्हाला जवळपास २५ हजार रुपये अजून खर्च करावे लागतील. ऑनलाईन क्लास जॉईन करणे , वेब ब्राऊझिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि स्प्रेडशीटवर काम करणे व गेमिंग दैनंदिन कामासाठी हे टॅब्लेट्स उपयुक्त ठरू शकतात. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
हेही वाचा : Apple च्या ‘या’ प्रॉडक्टवर मिळतेय तब्बल २५ हजारांची भरघोस सूट, जाणून घ्या ऑफर्स
9th Gen अॅपल iPad
अॅपलचा 9th Gen iPad हा टॅबलेट ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये असणारा सर्वोत्तम टॅबलेटपैकी एक आहे. यामध्ये HD रिझोल्युशन असणारा डिस्प्ले, प्रीमियम मेटल युनिबॉडी डिझाईन देण्यात आले आहे. तसेच हा टॅबलेट ३.५ मिमीचे हेडफोन जॅकसह येतो. प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर २८,९९० रुपयांना असणारा 9th Gen iPad टॅबलेट एक प्रीमियम सॉफ्टवेअरचा अनुभव देतो. तसेच यामध्ये ६४ जीबी इतके इंटर्नल स्टोरेज मिळते.
Xiaomi Pad 6
Xiaomi ने भारतात आपला नवीन टॅबलेट लॉन्च केला आहे. शाओमीने Pad 6 हा टॅबलेट लॉन्च केला आहे. यामध्ये डिस्प्लेला १४४ Hz इतका रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट, १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत. Xiaomi Pad 6 हे कंपनीने दोन स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत. ६/१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही २६,९९९ रुपये आणि ८/२५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २८,९९९ रुपये असणार आहे. Xiaomi Pad 6 कीबोर्डची किंमत ४,९९९ रुपये असणार आहे. तसेच हे २१ जूनपासून भरता खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. केस लॉन्च करण्यात आली असून त्याची किंमत १,४९९ रुपये आणि शाओमीच्या स्मार्ट पेनची किंमत ५,९९९ रुपये असणार आहे. ग्राहकांना हे Chick Mystic Blue आणि Classic Graphite Grey या रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.
Realme Pad X
Realme या टॅबलेटची किंमत १९,९९९ रुपये आहे. यात ११ इंचाचा डिस्प्ले येतो. १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम येते. तसेच ५ जीबी व्हर्च्युअल रॅम सुद्धा यामध्ये येते. या टॅबलेटमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा येतो. यात चार डॉल्बी ऍटमॉस स्पीकर असून याची बॅटरी ८३४० mAh इतक्या क्षमतेची येते.
हेही वाचा : Xiaomi ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट इअरबड्स, ३० तासांची बॅटरी लाईफ आणि…, जाणून घ्या किंमत
सॅमसंग Galaxy Tab S6 Lite
सॅमसंग Galaxy Tab S6 Lite या टॅबलेटची किंमत सध्या २७,९९९ रुपये इतकी आहे. ज्यांना एका लोकप्रिय ब्रँडचा टॅबलेट खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हे डिव्हाईस केवळ वायफाय आणि LTE कनेक्टिव्हीटी या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
Lenovo Tab P11 Plus
Lenovo Tab P11 Plus ची किंमत २६,४९९ रुपये आहे. हे डिव्हाईस ४जी LTE कनेक्टिव्हिटीसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज सह येते. हे डिव्हाईस MediaTek Helio G90T SoC वर आधारित आहे. Xiaomi Pad 6 प्रमाणे, यात डॉल्बी अॅटमॉससह क्वाड-स्पीकर सेटअप देखील आहे.