Xiaomi ही एक स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी अनेक नवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या MWC २०२३ मध्ये शाओमीने नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. तीच स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आता देशातील ४,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना Digital शिक्षण देणार आहे. यासाठी शाओमी कंपनीने युनायटेड वे इंडियासोबत भागीदारी केली आहे.
शाओमी कंपनीने गुरुवारी याबद्दलची घोषणा केली. शाओमी कंपनी कर्नाटक आणि दिल्ली-एनसीआरमधील १२ सरकारी आणि एका सरकारी अनुदानित शाळांमध्ये ४,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अशी लॅबची स्थापना करत आहे.
Xiaomi ने सांगितले की, कंपनीने युनायटेड वे इंडियासोबत टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यासाठी आणि डिजिटल शिक्षणाला समर्थन देण्यासाठी भागीदारी केली आहे. मुलांमध्ये शाश्वत भविष्यातील कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे. जे त्यांना आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करेल. या लॅब विद्यार्थ्यांना Digital Learning, मोबाईल टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्समध्ये मदत करतील.
Xiaomi इंडियाचे अध्यक्ष मुरली कृष्णन बी म्हणाले, या लॅब मुलांना विचारसरणीत वाढ करण्यासाठी, सर्जनशील बनवण्यासाठी, वास्तविक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि नवीन कल्पना मांडण्यास मदत करतील. ”आम्हाला खात्री आहे की, या भागीदारीमुळे आम्ही पारंपरिक शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणू असे Xiaomi इंडियाचे अध्यक्ष मुरली कृष्णन बी म्हणाले.