Xiaomi ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. नुकतेच कंपनीने Redmi 12 सिरीज लॉन्च केली. लॉन्च झाल्याच्या दिवसापासून आतापर्यंत कंपनीने या सिरीजमधील मॉडेल्सच्या ३ लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री करून एक उललेखनीय कामगिरी केली आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या मिड रेंज सेगमेंटमधील फोन्सना खरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
रेडमी १२ सिरीज एक प्रीमियम स्मार्टफोन अनुभव देते. जे फ्लॅगशिप ग्रेड क्रिस्टल ग्लास बॅक डिझाइन आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये चांगले प्रदर्शन करते. Redmi 12 5G चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 4 Gen 2 5G प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. या प्रोसेसरमध्ये एक फ्लॅगशिप स्तरीय 4nm आर्किटेक्चर असून फोन जलद कनेक्टिव्हिटी सक्षम करतो. तसेच ५जी च्या क्षमतांना अनलॉक करते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
हेही वाचा : आता चॅट करणे होणार सोपे; WhatsApp वरून पाठवता येणार अॅनिमेटेड अवतार, जाणून घ्या
किंमत आणि उपलब्धता
Redmi 12 4G आणि Redmi 12 5G आता आकर्षक ऑफरसह आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. Redmi 12 4G ची किंमत ४/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ तुम्ही हा फोन रुपये आहे. तर ६/१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे. तुम्ही हा फोन Mi.com, Flipkart.com, Mi Home, Mi Studio आणि अधिकृत किरकोळ डिलर्सकडे खरेदी करू शकता.
ज्यांना ५जी नेटवर्कचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी Redmi 12 5G हा फोन उपयुक्त ठरू शकतो. ४/१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये तर ६/१२८ च्या व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे. तसेच ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. तुम्ही हा फोन Mi.com, Flipkart.com, Mi Home, Mi Studio आणि अधिकृत किरकोळ डिलर्सकडे खरेदी करू शकता.
या फोन्सच्या खरेदीवर तुम्ही अतिरिक्त डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. जर का तुमच्याकडे ICICI खरेदी आणि डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला Redmi 12 4G किंवा Redmi 12 5G च्या ४जीबीच्या व्हेरिएंटवर १००० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. शाओमीचे विद्यमान वापरकर्ते सध्या Redmi 12 4G च्या 4GB व्हेरिएंटवर १,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात.