Xiaomi आज आपले काही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करणार आहे. शाओमी कंपनी आपल्या स्मार्टर लिव्हिंग इव्हेंटची आणखी एक सिरीज घेऊन येत आहे. कंपनी या इव्हेंटमध्ये आपले नवीन IoT आणि घरगुती उत्पादनांचे अनावरण करणार आहे. शाओमी कंपनीचा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. स्मार्ट लिव्हिंग २०२३ च्या आधी शाओमीने काही प्रॉडक्ट्स उघड केली आहे जी भारतात लॉन्च होणार आहेत.
शाओमीच्या या इव्हेंटमधील लॉन्च होणारे पहिले प्रॉडक्ट म्हणजे शाओमी एअर प्युरिफायर जो ३६० डिग्री शुद्धीकरण सिस्टिमसह येतो. यामध्ये बॉक्सची डिझाईन येते. तेश यामध्ये एक गोल आकाराचे देखील डिझाईन येते. याचा आकार कसलाही असला तरी कंपनीचे याचे डिझाईन अतिशय खास ठेवणार आहे. या डिव्हाइससाठी ग्राहक Xiaomi Home App चा वापर करू शकतात. २०१९ मध्ये Mi Air Purifier 3,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता.
Xiaomi स्मार्ट टीव्ही एक्स-प्रो सिरीज
Xiaomi Smarter Living 2023 इव्हेंटमध्ये अपेक्षित असलेले पहिले उपकरण हे त्याचे Smart TV X Pro मालिकेतील टेलिव्हिजन आहेत. जे भारतात Google TV वर चालणारा पहिला Xiaomi TV असणार आहे. Xiaomi Smart TV X Pro मालिकेचा फीचर सेट काय असेल याबद्दल कंपनीने भाष्य केले नाही आहे. Xiaomi च्या अधिकृत इव्हेंट पेजनुसार, प्रमुख फीचर्समध्ये डॉल्बी व्हिजन IQ प्रमाणपत्रासह 4K डिस्प्ले पॅनेल समाविष्ट असणार आहे.
२०२१ मधील स्मार्टर लिव्हिंग इव्हेंट
२०२१ च्या स्मार्टर लिव्हिंग इव्हेंटमध्ये कंपनीने MI नोटबुक प्रो, अल्ट्रा मॉडेल्स, Mi Smart Band 6, Mi Router 4A Gigabit Edition, Mi 360° Home Security Camera 2K Pro आणि Mi रनिंग शूज लॉन्च केले होते. या वेळच्या स्मार्टर लिव्हिंग इव्हेंटमध्ये कंपनी काय ऑफर करते हे जाणून घेण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कधी व कसा पाहता येणार इव्हेंट ?
२०२३ च्या शाओमी स्मार्टर लिव्हिंग इव्हेंटमध्ये कंपनी एअर प्युरिफायर, नवीन रोबोट व्हॅक्युम MOP, नवीन इलेक्ट्रिक रेजर आणि नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करू शकते.हा इव्हेंट आज भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. २०२३ च्या शाओमी स्मार्टर लिव्हिंग इव्हेंटमध्ये कंपनी एअर प्युरिफायर, नवीन रोबोट व्हॅक्युम MOP, नवीन इलेक्ट्रिक रेजर आणि नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करू शकते. हा इव्हेंट आज भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. तसेच ग्राहक हा इव्हेंट अधिकृत Xiaomi YouTube channel वर पाहू शकणार आहेत.