शाओमीने १२ जानेवारीपासून आपले ५जी (5G) स्मार्टफोन ११आय (11i) आणि ११आय हायपरचार्ज (11i HyperCharge) ची विक्री भारतामध्ये सुरु केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीने मागच्याच आठवड्यात हे दोन्ही स्मार्टफोन लॉंच केले असून कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ, एमआय होम आणि एमआय स्टुडिओ व्यतिरिक्त फ्लिपकार्ट तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून देखील हा फोन विकत घेता येऊ शकतो.
शाओमीच्या ११आय आणि ११आय हायपरचार्ज या दोन्ही स्मार्टफोनच्या डिजाईन आणि फीचर्समध्ये बरीच समानता आहे. ११आय हायपरचार्ज मॉडेलमध्ये ४५००एमएएच बॅटरी आहे जी १२०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय ११आयमध्ये ५१६०एमएएच बॅटरी असून ती ६७वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हेही वाचा : नव्या आयफोन १४ प्रो सीरिजमध्ये अॅपल करणार ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या कसे असेल नवे मॉडेल
शाओमी ११आय आणि ११आय हायपरचार्ज फोनवरील ऑफर
शाओमी ११आय हायपरचार्ज ५जीच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २६,९९९ रुपयांपासून सुरु होते. तर याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २८,९९९ रुपयांपासून सुरु होते. याचबरोबर शाओमी ११आय ६च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २४,९९९ रुपयांपासून सुरु होते. तर याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २६,९९९ रुपयांपासून सुरु होते.
शाओमीच्या ऑफरनुसार या स्मार्टफोन्सवर १५०० रुपयांचा इंट्रोडक्टरी डिस्काउंट, एसबीआय कार्ड यूजर्सना २५०० रुपयांचा कॅशबॅक आणि रेडमी नोटच्या वापरकर्त्यांना ४ हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. हे सगळे डिस्काउंट मिळून तुम्ही या स्मार्टफोन्सवर एकूण ८ हजार रुपये इतकी बचत करू शकता.
शाओमी स्मार्टफोन्सचे फीचर्स
शाओमीने दोन्हीही स्मार्टफोन्समध्ये ६.७ इंचाचा १०८०पी एमोलेड डिस्प्ले दिला आहे ज्याच्या रिफ्रेश रेट १२० हर्ट्स आहे. यासोबतच या स्मार्टफोन्समध्ये होल पंच कट-आऊट देखील देण्यात आला आहे.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.
या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉइड ११वर आधारित एमआययूआय १२.५ ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आला आहे.
शाओमीच्या १आय हायपरचार्ज मॉडेलमध्ये ४५००एमएएच बॅटरी आहे जी १२०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय ११आयमध्ये ५१६०एमएएच बॅटरी असून ती ६७वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एक्स-एक्सिस लिनिअर मोटार, वायफाय ६, ब्लूटूथ ५.२, ३.५ मिमी हेडफोन जॅक, ड्युअल स्पीकर, आयपी ५३ रेटिंग आणि कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन आहे.
या दोन्ही स्मार्टफोन्सच्या रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा असेल. यात प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सेल, ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड अँगल आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो शुटर मिळेल. तसेच १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असेल.