सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सगळीकडे कर्मचारी कपातीचे लोणं आले आहे. आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आता आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. आता ही कोणती कंपनी आहे आणि ती आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे ते जाणून घेऊयात.
Yahoo Inc कंपनीने टाळेबंदीची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. जाहिरात तंत्रज्ञान विभागाची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
याहू कंपनी एका युनिटमधून तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. म्हणजेच कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. या कपातीमुळे Yahoo च्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिणाम हा जाहिरात तंत्रज्ञान विभागाच्या होणार आहे.
गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या सांगण्यात आले होते की, १२ टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजे जवळजवळ १,००० जणांना कामावरून कमी केले जाणार आहे. तसेच येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल.