Technology Year Ender 2022 : या वर्षी अनेक स्मार्टफोन लाँच झालेत ज्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण डिजाईन आणि फीचर्समुळे लोकांची मने जिंकली. Nothing Phone (1) आपल्या ग्लिफ इंटरफेसमुळे, तर iphone 14 pro आपल्या डायनामिक आयलँड फीचर्मुळे चर्चेत राहिला. २०२३ मध्ये देखील अनेक भन्नाट फोन्स लाँच होतील. पण, त्या अगोदर २०२२ वर्षातील टॉप स्मार्टफोन्स कोणते होते? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये असेलच. तर चला या वर्षीच्या टॉप स्मार्टफोन्सवर टाकूया एक नजर.
१) सॅमसंग गॅलक्सी एस २२ अल्ट्रा
Samsung Galaxy S22 या स्मार्टफोनला अष्टपैलू फोन म्हणता येईल. फोनमध्ये उत्तम कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये अमोलेड डिस्प्ले, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज मिळते. फोनमध्ये एस पेन मिळतो आणि ५ वर्षांचे अँड्रॉइड ओएस सपोर्ट मिळते. फोनची किंमत १ लाख ३१ हजार ९९९ रुपये आहे.
(अँड्रॉइड फोनमध्ये Pre Installed असणार डिजिलॉकर, ‘Google’ने केली घोषणा, होणार ‘हे’ फायदे)
२) अॅपल आयफोन १४ प्रो
Apple iPhone 14 Pro स्मार्टफोन आधीच क्रॅश डिटेक्शन फीचर आणि एसओएस फीचरमुळे चर्चेत आहे. फोनच्या कॅमेरा, प्रोसेसर आणि डिस्प्ले फीचरमध्ये लक्षणीय सुधारणा आहेत. फोन स्थिर व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि गुणवत्तापूर्ण छायाचित्रे तयार करतो. फोनमधील डायनामिक आयलँड फीचर हे त्याला त्याच्या स्पर्धाकांपासून वेगळे करते. फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.
डायनामिक आयलँड हे आयफोनचे सॉफ्टवेअरवर आधारित तंत्रज्ञान आहे जे नॉचला इंटरअॅक्टिव्ह ब्लॅकबारमध्ये बदलवते ज्याचे आकार युजर कॉल, नोटिफिकेशन, मीडिया प्लेयर आणि बरेच काही दाखवण्यासाठी कमी अधिक होऊ शकते. एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये जाताना हे बार मल्टिटास्कींग पोर्टल म्हणूनही काम करते. या फोनची किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये आहे.
(Linkedin Account कायमचे किंवा तात्पुर्ते बंद करायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
३) गुगल पिक्सेल ७ प्रो
Google Pixel 7 Pro स्मार्टफोनला चांगले डिजाईन मिळाले आहे. कॅमेऱ्याचे हार्डवेअर चांगले आहे. एआय आधारित मॅजिक इरेजर आणि मोशन मोड शॉट्स हे उत्तम फोटोग्राफी होण्यात मदत करतात. मोबाईल सर्व लाइटिंग परिस्थितीत उत्तम फोटो काढतो. या फोनची किंमत ८४ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.
४) वन प्लस नॉर्ड २ टी ५जी
One Plus Nord 2T 5G स्मर्टफोनला मागे आणि पुढे दोन्ही बाजूला गोरीला ग्लास आहे. वेगवान ५ जी सेवेचा आनंद घेण्यासाठी हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. फोनमध्ये दमदार मीडियाटेक डायमेन्सिटी १३०० प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले असून त्यात ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज मिळते. फोनची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे.
(Photo Quality सुधारायची आहे? मग वापरा ‘या’ AI वेबसाइट्स, व्हिडिओतील बॅकग्राउंडही हटवू शकता)
५) पोको एम ५
POCO M5 स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच फूल एचडी एलसीडी स्क्रीन मिळते जी कॉर्निंग गोरिला ग्लासने सुरक्षित आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी ९९ चिपसेट, अँड्रॉइड ११ ओएसवर आधारित एमआययूआय ऑपरेटिंग सिस्टिम, ५ हजार एमएएचची बॅटरी आणि १४ वॉट चार्जर मिळतो. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजसह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोन १४ हजार ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.