Year Ender 2023 : YouTube आता जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यावर दर ६० सेकंदांना ५०० तासांचा आशय अपलोड केला जातो. दर मिनिटाला लाखो लोक या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करीत आहेत आणि दर मिनिटाला कोटीच्या संख्येत लोक वेगवेगळे व्हिडीओ पाहत आहेत. दरम्यान, आता २०२३ मध्ये Google च्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्युबवर भारतीयांनी सर्वांत जास्त काय पाहिले आहे याची माहिती समोर आली आहे. या यादी ट्रेंडिंग व्हिडीओ, गेमिंग व्हिडीओ, संगीत व्हिडीओ श्रेणींमधील आहे. कंपनीच्या मते, “या वर्षी प्रेक्षकांना आकर्षित करणारे व्हिडीओ, देशाच्या सर्व भागांतून, विविध भाषांमधून अपलोड करण्यात आला आहे. भारताच्या विविधतेचा हा खरा दाखला आणि उत्सव आहे.”

चांद्रयान-३ ने इथेही मारली बाजी
२०२३ मध्ये भारतीयांनी सर्वांत जास्त पाहिलेला व्हिडीओ म्हणजे चांद्रयान-३ मिशन सॉफ्ट-लँडिंग लाइव्ह टेलिकास्ट (Chandrayaan-3 Mission Soft-landing LIVE Telecast). एका वेळी ८.६ मिलियन युजर्स हा व्हिडीओ थेट पाहत होते. YouTube वरील हा एकमेव थेट व्हिडीओ स्ट्रीमर होता; ज्यामध्ये एकाच वेळी इतके लोक व्हिडीओ पाहत होते. सध्या हा व्हिडीओ ७९ दशलक्षांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे

हेही वाचा – Best of 2023 : भारतात प्ले स्टोअरवर सर्वांत जास्त लोकप्रिय ठरले ‘हे’ अ‍ॅप्स; जाणून घ्या….


हे व्हिडीओ झाले सर्वाधिक ट्रेंड
मेन ऑन मिशन (Men on Mission) हा दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ राऊंड टू हेल (Round2Hell) चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे; जो भारतात मजेदार व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुभव सिंग बस्सी याचा यूपीएससी – स्टॅण्ड अप कॉमेडी (UPSC – Stand Up Comedy,), कॅरी मिनाटीचे डेली व्लॉगर्स पॅरोडी (Daily Vloggers Parody) व आशीष चंचलानी याचा ‘सस्ता बिग बॉस २’ (Sasta Bigg Boss 2) यांनी स्थान मिळवले.

त्याशिवाय अनुक्रमे सहाव्या, सातव्या व नवव्या क्रमांकावर हर्ष बेनीवाल यांचा चेकमेट (Checkmate), द वायरल फीवर चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या संदीप भैया या नव्या वेब सीरिजच्या पहिल्या भागाचे मूल्यांकन, टेक्नो गेमर्सचे जीटीए ५ चे गेमप्ले १५१) Gameplay of GTA 5 by Techno Gamers 151), आय स्टोल सुप्रा फ्रॉम माफिया हाऊस (I Stole Supra from Mafia House) GTA 5 Gameplay #151) व ‘बी.बी. की वाइन्स, अँग्री मास्टरजी पार्ट १६ (BB Ki Vines, Angry Masterji Part 16) हे व्हिडीओदेखील यूट्युबवर ट्रेंडिंग यादीमध्ये आहेत. दहाव्या क्रमांकावर स्टॅण्डअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यू यांचा हेल्थ एंग्जायटी (Health Anxiety) हा व्हिडीओ ट्रेंड करीत आहे. हा व्हिडीओ १९ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे.

त्यानंतर अकराव्या, बाराव्या व तेराव्या क्रमांकावर आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या चॅनेलवरील सुपर ११ आशिया कप २०२३ चा भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना, स्प्रेडिंग ज्ञान चॅनेलवरील यूट्युब चॅनेल कसे तयार करावे? आणि राऊंड टू हेल (Round2Hell) चॅनेलवरील ‘रोस्ट ऑन द ठुगेश शो एस०१०६’ (Roast on The Thugesh Show, S0106) हे व्हिडीओ ट्रेंडिंग यादीत होते.

हेही वाचा – आता Gmail द्वारेही मिळणार ॲमेझॉन अन् फ्लिपकार्टसारख्या सुविधा; करू शकाल ऑनलाईन खरेदी
वले.

त्यानंतर ‘ट्रिगर्ड इशान’ चॅनेलवरील ‘फुकरा इशान रिव्हिल्स बिग बॉस सीक्रेट्स (Fukra Insaan Reveals Bigg Boss Secrets) आणि सौरभ शुक्ला याचा मेक ऑफ जोक्स (MJO) चॅनेवरील ‘पापा की छुट्टी’ हे व्हिडीओ चौदाव्या व पंधराव्या क्रमांकावर यादीत होते.

सर्वाधिक पाहिलेले लाइव्ह स्ट्रीम्स
२०२३ मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिले गेलेले लाइव्ह स्ट्रीम्स म्हणजे इस्रो चांद्रयान-३ (८.०६ दशलक्ष), ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया (६.१५ दशलक्ष), ब्राझील विरुद्ध क्रोएशिया (५.२ दशलक्ष), वास्को वि फ्लेमिंगो (४.८ दशलक्ष) व स्पेसएक्स क्रू डेमो ( ४.०८ दशलक्ष) हे आहेत.