गूगल दर महिन्याला गूगल प्ले स्टोअरवर नुकत्याच लाँच झालेल्या ॲण्ड्रॉइड ॲप्सची यादी जाहीर करते; जे सर्वांत लोकप्रिय आहेत. पण, वर्षाच्या शेवटी गूगलने २०२३ मधील सर्वांत खास असे ॲप्स निवडले आहेत. हे असे ॲप्स आहेत की, ज्यांना वर्षभरात लोकांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. २०२३ मध्ये गूगलच्या पसंतीस उतरलेले अग्रक्रमावर असलेले पाच ॲप्स कोणते आहेत ते पाहू.
१. रीलसी रील व्हिडीओ एडिटर (Reelsy Reel Maker Video Editor) :
सध्याच्या डिजिटल पिढीसाठी रील्स बनवणे हा त्यांच्या करिअरचा जणू एक भाग झाला आहे. त्यामुळे रीलसी रील व्हिडीओ एडिटर ॲप तरुण मंडळींमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे. Reelsy वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यात मदत करते आणि ट्रेंडिंग टेम्प्लेटदेखील ऑफर करते. Reelsy हे ॲप Zed Italia Apps द्वारे विकसित केले गेले आहे आणि या ॲपला ३.९ रेटिंग दिली गेली आहे. तसेच हे ॲप ५,००,००० पेक्षा जास्त वेळा युजर्सकडून डाऊनलोड केले गेले आहे.
२. मूडिस्टोरी मूड ट्रॅकर (Moodistory – Mood Tracker) :
मूडिस्टोरी मूड ट्रॅकर हे एक मन ओळखण्याचे ट्रॅकर ॲप आहे. हे वापरकर्त्यांना ‘एकही शब्द न लिहिता’ पाच सेकंदांपेक्षा कमी वेळेत त्यांचा मूड ट्रॅक करण्याची अनुमती देते. तसेच वापरकर्त्यांच्या मूडशी संबंधित कलर-कोडेड आकडेवारी देते. मूडिस्टोरी हे ॲप मॅटॉफ लॅब्सने तयार केले आहे. तसेच या ॲपला ४.३ रेटिंग दिली गेली आहे आणि १०,००० पेक्षा जास्त युजर्सकडून ते डाऊनलोड केले गेले आहे.
हेही वाचा…Infinixने ‘हा’ नवीन लॅपटॉप भारतात केला लाँच ! स्टायलिश डिझाईनसह दमदार बॅटरी; किंमत…
३. व्हॉईडपेट गार्डन : मानसिक आरोग्य (Voidpet Garden : Mental Health) :
व्हॉईडपेट हे युजर्सचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. नकारात्मक विचार डोक्यातून किंवा मनातून काढून टाकणे आदी गोष्टींसाठी हे ॲप मार्गदर्शन करते. हे ॲप मजेदार ॲक्टिव्हिटीद्वारे आनंदी राहण्याचा आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करण्याचा मार्ग दाखवते. या ॲपला ४.४ रेटिंग आहे; तसेच ९,४०० लोकांनी या ॲपखाली त्यांचा रिव्ह्यूसुद्धा दिला आहे आणि १,००,००० युजर्सनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
४. ‘थ्रेड्स’ एक इन्स्टाग्राम ॲप (Threads, an Instagram app) :
हे मेटाच्या मालकीचे प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे Twitter)शी स्पर्धा करते आणि मजकुरावर आधारित संभाषणांवर लक्ष केंद्रित करते. या ॲपच्या पोस्टमध्ये फोटो, व्हिडीओ किंवा लिंकदेखील समाविष्ट असू शकतात. तसेच वापरकर्ते इन्स्टाग्रामवर आधीपासून फॉलो करीत असलेल्या प्रत्येकाला या थ्रेड्स ॲपवर आपोआप फॉलो करू शकतात. या ॲपला ४.२ रेटिंग आहे आणि १०० दशलक्ष लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
५. इनसाईट जर्नल : लर्न ॲण्ड ग्रो (Insight Journal : Learn & Grow) :
हे ॲप वापरकर्त्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी एआयप्रमाणे मदत करते. या ॲपमध्ये अनेक प्रश्न आणि छोटे छोटे टास्क दिले जातात; जे Solve करून तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकता. त्यात काही पुस्तके असतात. तसेच ३,५०० प्लस पुस्तकांमधून धडे अनलॉक करण्यासाठी युजर्सना इनसाइट प्लसची गरज लागते. प्लॅटो, थॉमस व व्हर्जिनिया वूल्फ यांसारख्या विचारवंतांच्या व्यक्तिमत्त्वांचा अवलंब करण्यास इनसाइट जर्नल हे मार्गदर्शक ठरू शकते. या ॲपला ३.६ रेटिंग आहे आणि १०,००० पेक्षा जास्त लोकांनी ते डाऊनलोड केले आहे.