एआय टूल्सची काही महिन्यांपासून बरीच चर्चा सुरू आहे. या टूल्सच्या निर्मितीमुळे काही क्षेत्रांवर परिणाम; तर काही क्षेत्रांमध्ये बदल होताना दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. तर वर्षाच्या अखेरीस एआय टूल्स कोणत्या क्षेत्रात, कोणत्या वैशिष्ट्यांसह उपयोगी आहेत हे आपण या ‘टॉप १०’ यादीतून पाहणार आहोत.
१. चॅटजीपीटी (ChatGPT) :
एआय टूल्सची यादी चॅटजीपीटीशिवाय अपूर्ण आहे. चॅट जीपीटी व्हर्जन ३.५ (ChatGPT Version 3.5) व चॅटजीपीटी व्हर्जन ४ (ChatGPT 4), असे दोन व्हर्जन चॅटजीपीटीमध्ये आहेत. तसेच नंतरची आवृत्ती म्हणजेच चॅटजीपीटी व्हर्जन ४ खूपच शक्तिशाली आहे. हे टूल आपल्यासाठी सर्व काही करू शकते. योग्य सूचना देणे, तुमच्यासाठी लेख लिहिणे, कोणत्याही विषयावरील रील्ससाठी स्क्रिप्ट तयार करणे आदी गोष्टी करण्यास मदत करते.
२. मिडजर्नी एआय (Midjourney AI) :
मिडजर्नी एआय हे टूल तुम्ही एखादा मजकूर लिहिलात की, त्याच्या आधारे तुम्हाला एक इमेज तयार करून देईल. तुम्हाला स्वतःहून ग्राफिक्स तयार करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला ज्या वस्तू किंवा गोष्टींची प्रतिमा हवी असल्यास तिथे तुम्ही एक मजकूर लिहायचा. मग मिडजर्नी एआय तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे एक फोटो तयार करून देईल.
३. कॅप कट एआय ( CapCut AI) :
कॅपकट हे ऑल-इन-वन व्हिडीओ साधन आहे; जे वापरकर्त्यांना शुल्क आकारून, एआयच्या मदतीने आश्चर्यकारक गोष्टी तयार करण्यास परवानगी देते. तरुण मंडळी या टूलच्या मदतीने काही सेकंदांत व्हिडीओ एडिट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी अगदी सहज शिकू शकतात. एकूणच हे खरोखर एक चांगले व्हिडीओ एडिट करण्याचे एआयचे साधन आहे. पण, यात एक नकारात्मक बाजूसुद्धा आहे. तुम्ही व्हिडीओ फ्रेम दर ६० प्रतिसेकंदपेक्षा जास्त वेगाने एक्स्पोर्ट करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला ही गोष्ट सोईस्कर वाटत असेल, तर तुम्ही या एआय टूलचा वापर करू शकता
४. व्होकल रिमूव्हर एआय (Vocal Remover AI) :
व्होकल रिमूव्हर एआय हे एआयमध्ये तुम्ही कोणत्याही संगीतातून आवाज, विविध वाद्ये रिप्लेस करू शकता. हे आवाज, ड्रम्स, गिटार व पियानो आदी वाद्येदेखील ऑडिओ गुणवत्ता नष्ट न करता, अगदी सोप्या पद्धतीने वेगळे करता येतात.
५. कटआउट.प्रो एआय (Cutout.Pro AI) :
महत्त्वाच्या कामांसाठी किंवा तातडीने पासपोर्ट फोटो हवा असल्यास हे कटआऊट.प्रो एआय टूल तुम्हाला मदत करील. तसेच तुम्हाला नको असलेले फोटोमधील बॅकग्राऊंडदेखील तुम्ही सहज काढू शकता. तसेच तुम्हाला फोटो एडिट करायचा असल्यास तुम्ही तेदेखील या एआय टूलच्या मदतीने करू शकता.
हेही वाचा…Year Ender 2023: २०२३मध्ये युट्युबवर भारतीयांनी सर्वात जास्त काय पाहिले? समोर आली यादी
६. हॉटपॉट एआय (Hotpot AI) :
हॉटपॉट एआय (Hotpot AI) हे क्लाउड-आधारित एनएफटी (NFT) निर्मिती साधन आहे; जे वापरकर्त्यांना त्यांचे स्वतःचे एनएफटी (NFT) तयार करण्यास अनुमती देते. हे टूल वापरकर्त्यांना डिझाइन टेम्पलेट्स, फिल्टर, फॉन्ट आणि बऱ्याच काही आवश्यक गोष्टी प्रदान करते. एआय टूल हे एनएफटीव्यतिरिक्त फोटोदेखील एडिट करू शकते.
७. रायटसोनिक एआय (Writesonic AI) :
रायटसोनिक एआय हे टूल कंटेन्ट लेखकांसाठी उपयोगी आहे. कारण- हे एक लेखन साधन आहे; जे तुम्ही लेखक ब्लॉग लिहिणे, लेखनकौशल्य सुधारणे आदी गोष्टींसाठी वापरू शकता. हे टूल फीडबॅक, एससीओ मेटा डिस्क्रिप्शन, आर्टिकलसाठी कल्पना सुचवणे, कंटेन्ट सुचवणे, ब्लॉग पोस्ट आदी गोष्टींसाठी मदत करते.
८. इलेव्हन लॅब्स एआय (Eleven labs AI) :
इलेव्हन लॅब्स एआय वापरकर्त्यांना नैसर्गिक आवाज देणारे भाषण तयार करण्यास, कस्टम एआय व्हॉइस डिझाइन करण्यास आणि त्यांचे आवाज क्लोन करण्यास परवानगी देते. ऑगस्टमध्ये हे टूल बीटामधून बाहेर पडल्यानंतर हे AI टूल त्यांचे ‘डीप लर्निंग मॉडेल अपडेट’ केले. त्यानंतर आता हे टूल २५ पेक्षा जास्त भाषांमध्ये मजकूर ओळखू शकते आणि त्याचे भाषण तयार करून देऊ शकते.
९. जास्पर एआय (Jasper AI) :
जास्पर एआय टूल मजकूर तयार करणे, वेगवेगळ्या भाषांचे तुमच्या आवडीनुसार भाषांतर करणे, क्रिएटिव्ह माहिती लिहिणे, तसेच तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे आणि त्या संदर्भातील माहिती प्रदान करणे आदी गोष्टी करते. हे टूल ग्राहक समर्थन (कस्टमर सपोर्ट) आणि ईमेल मार्केटिंगमध्ये जास्त वापरण्यात येते. अचूक रीतीने ग्राहकांच्या चौकशीला प्रतिसाद देण्यासाठी संस्था जास्पर एआय टूलचा वापर करू शकतात. हे टूल शीर्षक, उत्पादन वर्णन, ईमेल आणि ईमेल विषय तयार करणे आणि त्यासाठी एखादे टेम्पलेट्सदेखील वापरकर्त्यांना ऑफर करते. जर तुम्ही लहान-व्यवसायाचे मालक असाल किंवा अगदी फ्रीलान्सर असाल, तर हे साधन वापरून तुमचा व्यवसाय लक्षणीयरीत्या वाढवण्यात मदत होऊ शकते.
१०. पीपल एआय ( PeopleAI) :
पीपल एआयच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे असलेले कोणतेही प्रश्न या टूलला विचारू शकता आणि त्याच्या एआय आवृत्तीकडून एखादी व्यक्ती बोलतेय, असा प्रतिसाद मिळवू शकता.
तर हे आहेत २०२३ चे टॉप १० एआय टूल्स.