वर्षांतील सर्वात मोठा सेल अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आयोजित करत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना अनेक उत्पादने खरेदी करण्यावर उत्तम ऑफर्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर ई-कॉमर्स संकेतस्थळावरून खरेदी करतील. त्याचवेळी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर ठगांची टोळीही चांगलीच सक्रिय होत आहे. अशावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. ही संधी पाहून सायबर ठगांची टोळी लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. या काळात, लोकांवर होणार्‍या फिशिंग हल्ल्यांची संख्या देखील लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत, आपण या काळात कशी सावधगिरी बाळगली पाहिजे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या’ पद्धतीचा वापर करा

सेल दरम्यान, लोकांना असे अनेक कॉल्स येतात, ज्यामध्ये त्यांना खूप आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. अशा परिस्थितीत, अनेक लोक आकर्षक ऑफरच्या लालसेपोटी त्यांच्या बँकेशी संबंधित सर्व आवश्यक तपशील सायबर ठगांना शेअर करतात. तुम्ही तुमचे बँक तपशील, क्रेडिट-डेबिट कार्ड तपशील, ओटीपी इत्यादी इतर कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका. असे केल्याने तुमच्या सर्व पैसे सायबर ठगांपर्यंत पोहोचू शकतात.

(हे ही वाचा : Flipkart Big Billion Days Sale मध्ये २० हजारहून कमी किमतीत मिळवा या ‘स्मार्ट’फोन डील्स, पाहा फीचर्स व किंमत )

यादरम्यान अनेक वेळा सायबर ठग लोकांच्या मोबाईलवर अशा लिंक पाठवतात, ज्यामध्ये महागड्या वस्तू अगदी कमी किमतीत मिळतात. यामुळे लोक लोभस होऊन या लिंक्सवर क्लिक करतात. तुम्ही अशा फिशिंग लिंकवर कधीही क्लिक करू नये. असे केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

सेलदरम्यान, अनेक वेळा सायबर ठग लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध नवीन उपाय योजतात. अशा परिस्थितीत प्रत्येक आघाडीवर सतर्क राहण्याची गरज आहे. तुमच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते.