Delete twitter account with simple steps : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. कर्मचारी कपात, उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी यामुळे एकीकडे कंपनी अस्थिर होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे ब्ल्यू टिकसाठी शुल्क घेण्याच्या निर्णयामुळे युजर्समध्ये नाराजी आहे. यामुळे ट्विटरचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे परिणामही दिसले आहेत. ट्विटरवर ब्ल्यू टिक्स असलेली बनावट खाती वाढल्याचे समोर आले आहे. या दोन्ही गोष्टींचा युजर्सवर नक्कीच विपरित परिणाम पडलाच असले. तुम्हाला या गोष्टी सहनशीलतेबाहेर वाटत असेल आणि तुम्ही ट्विटर खाते डिलीट करण्याच्या विचारात असाल तर पुढील स्टेप्सद्वारे तुम्ही ट्विटर खाते डिलीट करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(आयफोन १५ अल्ट्रा येताच अलिकडेच लाँच झालेला ‘हा’ मॉडेल होणार बंद? लिकमधून जाणून घ्या किंमत आणि बरेच काही)

ट्विटर खाते कायमचे डिलीट करण्यासाठी हे करा

  • ट्विटर खाते कायमचे डिलीट करण्यासाठी आधी तुम्हाला त्यास डिअ‍ॅक्टिव्हेट करावे लागेल.
  • यासाठी मोबाइलवरील स्क्रिनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल पिक्चर आयकनवर क्लिकर करा. ‘सेटिंग्स अँड सपोर्ट’ अंतर्गत ‘सेटिंग्स आणि प्रायव्हसी’वर क्लिक करा.
  • डेक्सटॉपवरून ही प्रक्रिया करत असल्यास ट्विटरच्या लेफ्ट बारवर असलेल्या इलिप्सिस (…) आयकनवर क्लिक केल्यावर हा पर्याय तुम्हाला मिळेल.
  • या नंतर ‘युअर अकाउंट’वर क्लिक केल्यावर तुम्हाला ४ पर्याय देण्यात येतील. सर्वात खाली ‘डिअ‍ॅक्टिव्हेट अकाउंट’ हा पर्याय तुम्हाला सापडेल. या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला खाते बंद केल्यावर काय होते, याबाबत माहिती दिली जाईल. माहिती वाचल्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो करा.
  • यानंतर रिअ‍ॅक्टिव्हेशन काळ निवडा. ट्विटर तुम्हाला १२ महिने किंवा ३० दिवस असे दोन पर्याय देते. तुम्ही जो कालावधी निवडाल त्यात तुम्ही ट्विटर रिअ‍ॅक्टिव्हेट केले नाही तर तुमचे खाते आपोआप डिलिट होईल.
  • रिअ‍ॅक्टिव्हेशन काळ निवडल्यानंतर ‘डिअ‍ॅक्टिव्हेट’ बटनवर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया केल्यानंतर तुमचे ट्विटर खाते डिअ‍ॅक्टिव्हेट होईल. तुम्ही रिअ‍ॅक्टिव्हेशन काळाच्या आत ट्विटर सुरू केले नाही तर तुमचे अकाउंट आपोआप डिलीट होईल. याचबरोबर, थर्ड पार्टी अ‍ॅप्सना ट्विटर अ‍ॅक्सेस दिले असेल तर ते रद्द करा. कारण त्यांच्याकडून चुकून तुमचे खाते सुरू होऊ शकते. असे होऊ नये म्हणून सदर गोष्टींची खात्री करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can delete twitter account with this simple steps ssb