Valentine Day: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर ते व्यक्त करण्याचा आनंद काही औरच.त्यामुळे आपल्यावरचं प्रेम कुणीतरी व्यक्त करेल याऐवजी आपणच पुढाकार घेऊन त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं तर… असा सकारात्मक विचार अलीकडच्या मुली करतात. व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला असतो. त्यापूर्वी आठवडाभर हे सेलिब्रेशन सुरु होतं.
जर तुमचे कोणावर प्रेम असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या भावना अधिक चांगल्या स्वरूपात डिजिटल पद्धतीने व्यक्त करण्यासाठी उत्सुक असाल तर WhatsApp च्या काही फीचर्सचा वापर करू शकता. WhatsApp मधील ८ फीचर्समध्ये मदतीने तूतुम्ही तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगू शकणार आहात. हे ८ फीचर्स कोणती आहेत ज्यावरून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकणार आहात हे जाणून घेऊयात.
आपले जोडीदारावरील प्रेम कसे व्यक्त करावे ?
Pin Chat
व्हाट्सअॅपच्या पिन चॅट या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चॅटला व्हाट्सअॅपच्या लिस्टमध्ये सगळ्यात वरती पिन करून शकता. अँड्रॉइड वापरकर्ते चॅटवरती टॅप करून पिन चॅट करू शकतात . तर आयफोन वापरकर्ते चॅटवर उजवीकडे स्वाईप करून चॅट पिन करू शकतात. यामुळे तुमचं जोडीदाराला तुम्ही सर्वाधिक महत्व देता असे वाटेल.
Emoji reaction
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्यावर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे योग्य लक्ष नन दिल्याचा आरोप होत असल्यास असे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी इमोजी हे मस्त असे फिचर आहे. WhatsApp वरील Emoji reaction मुले तुम्ही तुमच्या जोडीदाराला केलेल्या मेसेजमध्ये एक प्रकारचे तुमचे भाव किंवा जिवंतपणा दिसून येतो.
Status updates
व्हाट्सअॅप हे एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्ही तुमचे स्टेटस देखील शेअर करू शकता. म्हणजेच व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमचा आणि जोडीदाराचा व्हिडीओ, फोटो किंवा तुमच्या जोडीदारासाठी रोमँटिक मेसेज , व्हिडीओ स्टेट्स ला शेअर करू शकता.
Voice messages
जर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ऑफिसचे, कॉलजेचे टायमिंग वेगवेगळे असेल आणि त्यामुळे तुम्हाला भेटणे शक्य होत नसेल तर तुम्ही या फीचरचावापर करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्हॉइस मेसेज पाठवू शकता. तसेच एकमेकांचा आवाज या व्हॉइस नोट्स मुळे तुम्ही ऐकू शकता. तुम्ही तुमच्या भावना या फीचरद्वारे व्यक्त करू शकता.
हेही वाचा : VI Valentine Offer: ५ जीबी डेटासह मिळणार ५००० रुपयांचा कॅशबॅक, मग करा फक्त ‘हे’ काम
Custom notifications
या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कस्टम नोटिफिकेशन टोन सेट करू शकता. याच्या मदतीने तुमचिया जोडीदाराचे आलेले कॉल्स व मेसेज लगेच ओळखू शकता. या फीचरमुळे त्यांचे मेसेज व कॉल्स आलेले तुम्ही वागण्याचे विसरणे ही शक्यता खूपच कमी होते.
Live location
जर व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटण्याचा प्लॅन केला आहे पण तुम्ही त्यांना भेटू शकत नाहीये म्हणजे ते नक्की कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही या फीचर्स चा वापर करू शकता. व्हाट्सअॅप तुम्हाला एका मर्यादित कालावधीसाठी तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची परवानगी देते. याद्वारे तुम्ही एकमेकांना लवकर भेटून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
Polls
व्हाट्सअॅपचे हे फिचर खूपच मजेदार आहे. तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचे हे ठरवू शकत नसाल तर तुमच्या मित्रांकडून याबाबद्दल मत जाणून घ्यायचे असल्यास व्हाट्सअॅप पोलचा वापर करून तुम्ही जोडीदारासाठी काय गिफ्ट घ्यायचे हे ठरवू शकता.
Digital avatars
WhatsApp तुम्हाला तुमचा डिजिटल अवतार तयार करण्यास मदत करते. WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमचा डिजिटल आवार किंवा कार्टून तयार करू शकता. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराचा असा डिजिटल अवतार तुम्ही तयार केला तर जोडीदार अधिक आनंदी होईल.