भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्स मनोरंजनाच्या बाबतीत वर्चस्व गाजवताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी अधिकाअधिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळवले. हे ओटीटी माध्यमांच्या वाढत्या सबस्क्राईबर संख्येतून स्पष्ट होते. आपल्यालाही आता याची इतकी सवय झाली आहे की एखादी नवीन वेबसिरीज किंवा चित्रपट रिलीज झाला की आपल्याला लगेच तो पाहायचा येतो. पण काही ओरिजिनल कंटेन्ट फक्त सबस्क्राइबर्स साठीच उपलब्ध असतो. पण बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने त्या सर्वांना एकावेळी सबस्क्राइब करणे खर्चिक असते. यापैकी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन मिळवण्यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे.
जिओच्या आणि एअरटेलच्या काही रीचार्ज प्लॅन्समधून तुम्ही नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन मिळवू शकता. कोणते आहेत ते प्लॅन्स जाणून घेऊया.
आणखी वाचा : आता YouTube Shorts मधूनसुद्धा करता येणार कमाई; कशी करायची सुरूवात लगेच जाणून घ्या
जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
- जर तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचा मोफत आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही हा जिओ पोस्टपेडचा प्लॅन घेऊ शकता.
- यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह एका दिवसात १०० मेसेज करण्याची सुविधा मिळेल.
- याबरोबरच तुम्हाला नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.
- या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा उपलब्ध होतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यात २००जीबी डेटा रोलओव्हरसह उपलब्ध होतो.
जिओचा ५९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅन
- जिओचा हा प्लॅन पोस्टपेड श्रेणीत सर्वाधिक लोकप्रिय आहे. ५९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला १००जीबी डेटा मिळतो. यामध्ये तुम्ही २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर वापरू शकता.
- या रिचार्ज प्लॅनवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.
- या प्लॅनचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
आणखी वाचा : पार्किंगमध्ये गाडी शोधण्यासाठी गूगल करणार मदत! काय आहे हे फीचर जाणून घ्या
एअरटेलचा १,१९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
- या पोस्टपेड प्लॅनमध्ये, तुम्हाला नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि डिजनी प्लस हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्येही जिओप्रमाणे तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेज करण्याची सुविधा मिळते.
- या रिचार्जपॅकमध्ये कंपनीकडुन १५० जीबी डेटा रोलओव्हर साठी उपलब्ध केला जातो.
- हा एअरटेल पोस्टपेडचा सर्वाधिक विकला जाणारा प्लॅन आहे.