‘आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. आज, १४ मे रोजी भारतासह जगभरात ‘मदर्स डे’ उत्सहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? यांसारखे प्रश्न, शंका दूर सारून आजकाल तरुणाई मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा करताना दिसते.

‘मदर्स डे’ च्या निमित्ताने तुम्ही जर का तुमच्या आईला एखादी चांगली भेट देऊ इच्छित असाल तर, सध्या टेक्नॉलॉजीचा काळ आहे. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोन, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि अन्य गॅजेट्स भेट देऊ शकता. तर काही गॅजेट्स जी तुम्ही या दिवशी आईला भेट म्हणून देऊ शकता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
Happy Children's Day 2024
Happy Children’s Day 2024 : जपान आणि भारताची मैत्री कशी झाली? नेहरूंनी टोकियोच्या मुलांना ‘हत्ती’ भेट दिल्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला?
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Aai Baba Retired hot ahet Marathi Serial entertainment news
आईला निरोप आणि आईबाबांचे स्वागत…
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

हेही वाचा : Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…, जाणून घ्या महिन्याला किती येणार खर्च?

vivo T2 5G

Vivo T2 5G या फोनमध्ये तुम्हाला पॉली कार्बोनेट बॅक असे डिझाईन मिळणार आहे. फोन ड्युअल शेडमध्ये येईल ज्याचा रंग सूर्यप्रकाशात प्रवेश करताच बदलेल. विवोच्या या फोनमध्ये तुम्हाला ६.४ इंचाचा OMLED डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० hz इतका असणार आहे. तसेच सेफ्टी फीचर्समध्ये या फोनला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. Vivo T2 5G आणि Vivo T2 X 5G हे फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. vivo T2 5G या फोनच्या ६ /१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत१८,९९९ रुपये आहे. तर ८/१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

vivo T2x 5G

Vivo T2 X 5G या स्मार्टफोनमध्ये IPS डिस्प्ले मिळेल ज्याला १२० hz चा रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये MediaTek Demensity 700 हा प्रोसेसर येतो. ड्युअल कॅमेरा सेटॅपमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ५००० mAh चा बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. तसेच हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे. ज्यामध्ये ४/१२८ जीबी, ६/१२८ जीबी आणि ८/ १२८ जीबी असे पर्याय उपलब्ध असणार आहेत.  Vivo T2 X 5G हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता

हेही वाचा : आता भारतामध्ये Google ‘Bard AI’ चा वापर करता येणार; मोफत वापरण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Realme Watch 3 Pro

Realme च्या या वॉचमध्ये तुम्हाला १.७८ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये इनबिल्ट जीपीएस आणि ब्लूटूथचा ५.३ चा सपोर्ट आहे. तसेच फिमेल हेल्थ ट्रॅकिंगची सुविधा या वॉचमध्ये आहे. १० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड व धावणे, चालणे, सायकलिंग करणे असे ५ मोठे स्पोर्ट्स मोड दिले आहेत. या वॉचमध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, स्लिप मॉनिटर , स्ट्रेस मॉनिटर सारखे फीचर्स आहेत. वॉच एकदा चार्ज केले की त्याला १० दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो. हे वॉच तुम्ही ४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F14 5G

सॅमसंगने आपला Galaxy F14 5G हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. हा कमी किंमतीमध्ये असणारा ५ जी फोन तुम्हाला खरेदी करण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. फोनमध्ये २ दिवसांचा बॅटरी बॅकअप देखील मिळतो. या फोनमध्ये वापरकर्त्याला ६.६ इंचाचा फुलएचडी प्लस IPS डिस्प्ले पॅनेल देण्यात आले आहे. ज्यामध्ये कॉर्निंग गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा फोन तुम्ही १२,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.