दूरदर्शनला मोठा इतिहास आहे. ज्यात ब्लॅक आणि व्हाइट या रंगांपासून ते नंतर स्मार्ट टेलिव्हिजनने लोकांमध्ये आपले स्थान निर्माण केले. टेलिव्हिजनचा हा इतिहास पाहता २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ साली संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी २२ नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. याच निमित्ताने जर तुम्हीही तुमच्या घरातील टेलिव्हिजन लवकरच स्मार्ट टीव्हीत बदलण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशीच काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही सर्वोत्तम स्मार्ट टेलिव्हिजन निवडू शकता. त्याबद्दल जाणून घेऊयात….

टीव्हीच्या डिस्प्लेची तडजोड करू नका

जेव्हा तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करायला जाणार तेव्हा तुम्हाला फक्त HD किंवा 4K स्मार्ट टीव्ही घ्यावा लागेल याची खात्री करा. कारण HD आणि 4K TV मध्ये व्हिडिओ क्वालिटी जास्त चांगली आहे. यासोबतच स्मार्ट टीव्ही घेताना पिक्चर क्वालिटी तपासा. यासाठी तुम्ही स्मार्ट टीव्हीवर कार्टून पाहू शकता. कारण बहुतेक कार्टून कॅरेक्टर हे मल्टी कलर आहेत आणि यावरून तुम्हाला स्मार्ट टीव्हीच्या पिक्चर क्वालिटीची कल्पना येईल.

आवाजाची गुणवत्ता तपासणे

स्मार्ट टीव्हीमध्ये स्क्रीननंतर त्याच्या आवाजाच्या गुणवत्तेचा प्रश्न येतो. जर तुम्ही मोठी स्क्रीन आणि HD किंवा 4K स्क्रीन असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी केला असेल. पण टीव्हीच्या आवाजाचा दर्जा चांगला नसेल तर तुमच्या स्मार्ट टीव्हीची मज्जा अर्धवटच राहणार आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करता तेव्हा त्यात ५ ते १० वॅटचे स्पीकर असावेत. हॉलमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या खोलीत स्मार्ट टीव्ही लावायचा असेल, तर पोर्टेबल स्पीकरही वापरता येतील.

कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पर्याय आहेत

स्मार्ट टीव्हीमध्ये हार्ड डिस्क सपोर्ट, MP4, AVI, MKV सारख्या सामान्य व्हिडिओ फॉरमॅट्स सुरळीतपणे प्ले व्हायला हवे. यासह, एचडी सामग्री ऑनलाइन पाहताना प्रदर्शनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये. यासह, टीव्ही खरेदी करण्यापूर्वी USB प्लेबॅक कामगिरी एकदा तपासून घ्या.

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसह काय करू शकता?

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या टीव्हीवर एकापेक्षा जास्त अॅप्स स्वतंत्रपणे इंस्टॉल केले जाऊ शकतात. यामध्ये इंटरनेटसाठी वाय-फाय, इथरनेट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, मोशन सेन्सर देखील आहेत जे गेम खेळण्यासाठी उपयुक्त आहेत. काही टीव्हीमध्ये USB पोर्ट असतो ज्यामध्ये कीबोर्ड कनेक्ट केला जाऊ शकतो. हे वेबकॅम आणि माइक कनेक्ट करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ब्लूटूथच्या साहाय्याने वायरलेस उपकरणेही त्याच्याशी जोडली जाऊ शकतात.

Story img Loader