You Should Turn Off Your WiFi Router at Night: हल्ली बहुतांश लोकांच्या घरी इंटरनेट हे असतंच. वर्क फ्रॉम होममुळे आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, जवळ-जवळ प्रत्येक घरात Wi- Fi वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑफिसच्या कामांपासून ते अगदी ऑनलाईन शिक्षणापर्यंत सर्वांकरिता वायफाय आता आवश्यक झाले आहे. तंत्रज्ञानाने लोकांच्या आरोग्याला जेवढ्या सोयीसुविधा दिल्या आहेत, त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. वायफाय देखील असेच काहीतरी करते. परंतु हे टाळले जाऊ शकते, विशेषतः जेव्हा आपण ते वापरत नसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांगल्या कनेक्टिव्हिटीसह बरेच आजार

उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेट स्पीडसाठी, आपण घरी वायफाय स्थापित करतो, परंतु त्यामुळं धोका होऊ शकतो तुम्हाला माहित आहे का, तुम्ही त्यातून किती आजारी पडू शकता. वायफायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. वास्तविक, वायफाय राउटरमधून अनेक प्रकारच्या रेडिएशन लहरी बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला नैराश्य, निद्रानाश आणि उच्च रक्तदाब सारखे आजार होऊ शकतात.

(हे ही वाचा: भारतातील ‘या’ मोठ्या उद्योगपतीने Elon Musk ला दिला दणका! ब्लू टिक हटताच Tesla कार खरेदीचा प्लॅन केला रद्द )

वायफायमुळे कोणते आजार होऊ शकतात

वाय-फायच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि इंटरनेटचा अतिवापर यांचाही तुमच्या झोपेवर परिणाम होतो. यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. वाय-फायच्या रेडिएशन लहरींचा आपल्यावर मानसिक परिणाम होतो. इंटरनेटच्या अतिवापरामुळेही लोकांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत आहे. यामुळे अल्झायमरची समस्या निर्माण होत आहे.

‘हे’ आजार कसे टाळावे?

आजच्या काळात प्रत्येकाला चांगली कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेट स्पीड आवश्यक आहे आणि त्याशिवाय तुमची अनेक कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. तथापि, त्यांचे वाईट परिणाम टाळण्यासाठी, आपण त्यांचा वापर मर्यादित करू शकतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच त्यांना ठेवा. रात्री झोपताना वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, तुम्ही केवळ किरणोत्सर्गाच्या लहरी आणि विद्युत चुंबकीय लहरींपासून स्वतःला वाचवू शकत नाही तर विजेचीही बचत कराल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You should turn off your wifi router at night know how dangerous it is heres how pdb