Valentine Day फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. कारण हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. सोशल मीडियामुळे हल्ली व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ खूप वाढली आहे.मात्र आजच्या दिवशी तुमच्या पार्टनरला काय गिफ्ट द्यायचे हे नक्की ठरवता येत नसेल तर आजच्या तुम्ही तुमच्या पार्टनरला गॅजेट्स गिफ्टमध्ये देऊ शकता. आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कोणते गॅजेट्स भेट देऊ शकता हे आपण आज जाणून घेऊयात.
Apple iPhone 13
Apple कंपनीचे iPhone हा व्हॅलेंटाईन डे साठी तुमच्या पार्टनरला भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम गिफ्ट आहे. या दिवशी हा फोन गिफ्ट दिल्याने तुमचा पार्टनर तुमच्यावर खुश होइउ शकतो. कारण आयफोन हा प्रत्येकाला आवडता असतो. आयफोन १३ तुम्ही भेट देऊ शकता. याची किंमत ६०,९०० रुपयांना खरेदी करू शकता.
Dyson Airwrap
व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्या पार्टनरला भेट देण्यासाठी डायसन एअररॅप हे एक बेस्ट गॅजेट आहे. जर तुमच्या जोडीदाराला त्यांचे केसांची हेअरस्टाईल करायला आवडत असेल तर त्यांना हे गिफ्ट फारच असेल. Airwrap हे केसांच्या सर्व हेअरस्टाइलसाठी उपयुक्त आहे. याची किंमत ४५,९०० रुपये असून यावर तुम्हाला ३,९९० रुपयांची मोफत ट्रॅव्हल बॅग मिळणार आहे.
Samsung Galaxy S23
Samsung Galaxy S23 सिरीज नुकतीच लॉन्च झाली आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर येतो. यामध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP68 रेटिंग, वायरलेस चार्जिंग, ट्रिपल कॅमेरा सेटअप व अनेक प्रीमियम फीचर्स यामध्ये आहेत. S23 सिरीजमधील स्मार्टफोन १२८ व २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट मध्ये तुम्ही खरेदी करू शकता व तुमच्या पार्टनला व्हॅलेंटाईन डे निमित्त भेटदेऊ शकता.
हेही वाचा : ChatGPT बाबत Google Search चे प्रमुख प्रभाकर राघवन यांचे मोठे विधान; म्हणाले…
Samsung Galaxy Buds 2
व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरला Samsung Galaxy Buds 2 सुद्धा गिफ्ट करू शकता. हे बड्स ७,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. हे TWS वायरलेस इअरफोन्स तुम्हाला कमी किंमतीत तुम्हाला अपेक्षित असलेली सर्व फीचर्स देते. यामध्ये एकदा चार्जिंग केले की २० तास बॅटरी लाईफ तुम्हाला मिळणार आहे. हे इअरबड्स सॅमसंग कंपनीचे असले तरी देखील तुम्ही कोणत्याही अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइसवर कनेक्ट करू शकता.