Smartphone Camera Tips: सोशल मीडियावर सेल्फी किंवा फोटो पोस्ट करणे सध्या तरुण मंडळींमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना आपण सगळ्यात आधी कॅमेरा पाहतो. 0.1 MP रिझोल्यूशनपासून ते आता 200 MP पर्यंत स्मार्टफोनवरील कॅमेरे आता अपडेट होत चालेल आहेत; जे डीएसएलार कॅमेऱ्यांप्रमाणेच फोटो आणि व्हिडीओ गुणवत्ता देतात. पण, तुमची एक साधी चूक तुमच्या स्मार्टफोन कॅमेराचे कायमचे नुकसान करू शकते. तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्याचे कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी तुम्ही पुढील पाच गोष्टी टाळल्या पाहिजेत:

द इंडियन एक्स्प्रेसने चार उपाय सुचविले आहेत ते पुढीलप्रमाणे…

Five tips to manage diabetes
डायबेटीस नियंत्रणात ठेवणे एकदम सोपे; फक्त डॉक्टरांच्या ‘या’ ५ टिप्स करा फॉलो अन् मिळवा आराम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
How to Clean Your Laptop Screen
लॅपटॉप, टीव्हीची स्क्रीन साफ करताना टाळा ‘या’ चुका; नाही तर वाढेल खर्च
Avoid these mistakes when using rosemary water
रोझमेरीच्या पाण्याचा वापर करताना टाळा ‘या’ चुका; तज्ज्ञांच्या महत्त्वाच्या टिप्स..
Car Tyre Tips
‘या’ सोप्या टिप्स लक्षात घेतल्यास कार आणि बाईकचा टायर चालेल दीर्घकाळ

१. लेझर लाईट शो स्मार्टफोनद्वारे शूट करू नका (Do not shoot a laser light show using your smartphone) :

अनेक कार्यक्रमांमध्ये, इव्हेंटमध्ये लेझर लाईटचा उपयोग केला जातो. तर या लेझर लाईट तुमच्या स्मार्टफोनने शूट केल्याने तुमच्या कॅमेरा सेन्सरचे कायमचे नुकसान होऊ शकते. तसेच या लाईट्सचा कॅमेऱ्याच्या लेन्स सिस्टम आणि सेन्सर दोन्हीवर परिणाम होऊ शकतो, तर शक्यतो असे करणे टाळा.

२. तुमचा स्मार्टफोन दुचाकीवर ठेवू नका (Mounting on a bike) :

एखाद्या अनोळखी ठिकाणी पोहचण्यासाठी आपण मोबाइलमध्ये लोकेशन सेट करून तो आपल्या समोर दुचाकीवर बसवून घेतो. तर तुमचा स्मार्टफोन बाइक किंवा दुचाकीवर बसवल्याने स्मार्टफोनचा कॅमेरा कायमचा खराब होऊ शकतो. वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या कंपनांमुळे हे होण्याची शक्यता जास्त असते. बाइकवर स्मार्टफोन ठेवायचा असेल तर कंपन शोषण्यासाठी डिझाइन केलेले स्पेशल माउंटिंग किट मार्केटमध्ये मिळते, ते खरेदी करा आणि त्याचा वापर करा.

हेही वाचा…जीमेलच्या साईड पॅनलवर झळकलं जेमिनी AI; फाइल्स अन् ईमेल डेटा शोधणे होणार सोपे; कसे वापरावे, फायदे काय? जाणून घ्या…

३. पाण्यात स्मार्टफोन वापरणे टाळा (Do not use a smartphone underwater) :

काही कंपन्या असा दावा करतात की, तुम्ही स्मार्टफोन घेऊन पाण्यात व्हिडीओ काढू शकता, फोटोशूट करू शकता आदी जाहिराती करतात. कारण त्यांचे हे स्मार्टफोन वॉटरप्रूफ असतात. पण, पाण्यात मोबाइल वापरणे हे IP रेटिंगसह, डिव्हाइसला कायमचे नुकसान पोहचवू शकते. पाण्यात स्मार्टफोन वापरामुळे फोन गरम होतो आणि कंडेन्सेशमुळे (condensation) सिस्टीममध्ये पाणी शिरू शकते व कॅमेऱ्याचे प्रचंड नुकसान होऊ शकते.

४. कडक उन्हात, जास्त थंड तापमानात स्मार्टफोनद्वारे शूटिंग करू नका (Shooting in extreme temperatures) :

अनेकांना आकाशातील चंद्र, सूर्य यांचे फोटो काढण्यास खूप आवडतात. पण, खूप थंड किंवा खूप गरम तापमानात स्मार्टफोनद्वारे शूटिंग केल्याने कॅमेरा खराब होऊ शकतो. उदाहरणार्थ – सूर्यग्रह, सूर्यास्तच्या वेळी सूर्याच्या किरणांकडे कॅमेरा ठेवून सूर्याचे थेट फोटो काढणे कॅमेऱ्याचे नुकसान करू शकते. पण, काही स्मार्टफोनमध्ये मून मोडदेखील आहेत; त्यामुळे तुम्ही त्यांच्याद्वारे चंद्राचे फोटो काढू शकतात.

५. कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर वापरणे (Using camera lens protectors):

तुमच्यातील अनेक जण कॅमेऱ्याचे संरक्षण करण्यासाठी कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर वापरू शकता. पण, कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर फोटोची गुणवत्ता कमी करू शकते. तसेच कॅमेरा लेन्स आणि प्रोटेक्टरमधील अंतरात धूळ, कचरासुद्धा आतमध्ये जाऊ शकतो; ज्यामुळे कॅमेऱ्याच्या लेन्सचे नुकसान होऊ शकते.

Story img Loader