सध्याच्या काळामध्ये डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. हल्ली प्रत्येकजण कॅश जवळ बाळगण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटच करताना दिसून येतो. प्रत्येकजण हल्ली upi चा वापर करतो. आपल्या फोनमध्ये यासाठी गुगल पे , फोन पे , पेटीअम आणि अन्य apps असतात ज्यामधून आपण ऑनलाइन व्यवहार करतो. ऑनलाइन व्यवहार करत असताना आपल्याला यूपीआय पिन टाकावा लागतो. मात्र कधी आपला हा स्मार्टफोन हरवला तर आपले मोठे नुकसान होऊ शकते.

Upi सपोर्ट करणरे Apps हे वापरकर्त्यांना त्यांच्या बँक अकाऊंटमधून थेट डिजिटल पेमेंट करू देतात. जर का तुम्ही तुमच्या फोनमध्ये प्रायव्हसी सेटिंग ऑन केले नसले आणि तुमचं फोन हरवला किंवा फोन चुकीच्या हातांमध्ये गेला तर तुमचे अकाऊंट पूर्णपणे रिकामे होण्याची शक्यता असते. तुमचा फोन हरवला असेल आणि तो सापडत नाही तोपर्यंत तुम्ही या Apps न तात्पुरते किंवा कायमस्वरूपी ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुमच्याशिवाय इतर कोणताही व्यक्ती तुमच्या बँक अकाऊंटमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुमचं फोन हरवला असल्यास PhonePe, Google Pay आणि Paytm ही apps तुम्ही ब्लॉक करणे फायद्याचे ठरू शकते. हे App कसे ब्लॉक करायचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

silver button of YouTube in the hand of a monkey
आईशप्पथ, चक्क माकडाच्या हातात यूट्यूबचे सिल्व्हर बटण… VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
senior scams increasing
फसवे फोन कॉल ते ऑनलाइन हस्टलिंग; आजी-आजोबांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले; कारण काय? संरक्षणात्मक उपाय काय?
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हेही वाचा : SmartPhones Under 60000: जबरदस्त फिचर असलेले स्मार्टफोन खरेदी करताय? ‘हे’ आहेत बेस्ट, पाहा फीचर्स-किंमत

जर का तुम्ही गुगल पे वापरत असाल तर कस्टमर सर्व्हिसशी संपर्क साधण्यासाठी १८००४१९०१५७ तुम्ही हा नंबर डायल करू शकता. इथे संपर्क केल्यावर तेथील एक प्रतिनिधि तुमचे अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. जर का तुम्ही तुम्ही Android डिव्हाइस वापरत असाल तर, त्यामुळे फोनवरून Google Pay अ‍ॅप आणि तुमचे Google अकाऊंटमध्ये कोणालाही अॅक्सेस करण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमचा डेटा डिलीट करू शकता.

त्याशिवाय तुम्ही फोन पे चे वापरकर्ते असाल तर ०८०६८७२७३४ आणि ०२२६८७२७३४ या नंबरवर फोन करणे आवश्यक आहे. तेथील प्रतिनिधी तुम्हाला तुमचे अकाऊंट ब्लॉक कसे करायचे यासाठी मदत करतील.

तुमचा फोन हरवला असेल आणि तुम्ही पेटीअम App वापरत असाल तर अकाऊंट बंद करण्यासाठी तुम्ही पेटीअम पेमेंट्स बँक हेल्पलाईनवर 01204456456 या नंबरवर कॉल करू शकता.

हेही वाचा : SmartPhones Under 60000: जबरदस्त फिचर असलेले स्मार्टफोन खरेदी करताय? ‘हे’ आहेत बेस्ट, पाहा फीचर्स-किंमत

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही त्या App च्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा.

२. या नंतर तुम्हाला lost phone हा पर्याय निवडावा लागेल.

३. यानंतर Enter a different number हा पर्याय सिलेक्ट करावा.

४. वरील प्रोसेस झाल्यावर डिव्हाइसमधील सर्व अॅप्समध्ये लॉग आऊट हा पर्याय निवडा.