यूट्यूबवर एखादा व्हिडीओ बघता सतत ॲड्स येतात. त्यामुळे आपली चिडचिड होतेच; पण जबरदस्ती का होईना ती ॲड पाहावीच लागते. परंतु, आता यूट्यूबने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ॲड फ्री कन्टेन्ट आणण्यासाठी ‘पॉज ॲड्स’ फीचर्स रोल आउटची करण्याची घोषणा केली. The Verge ने अहवाल दिल्याप्रमाणे, यूट्यूबचे (YouTube) कम्युनिकेशन मॅनेजर असलेल्या ओलुवा फालोदुन (Oluwa Falodun) यांनी या खास फीचरची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलुवा फालोदुन यांनी सांगितले की, अनेक जाहिरातदारांनी या फीचरमध्ये रस दाखविला आहे. त्यामुळे युजर्सची वाढती संख्या पाहता, व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने हे फीचर जागतिक स्तरावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
जाहिरातमुक्त यूट्यूब (YouTube) व्हिडीओ पाहा:
२०२३ च्या सुरुवातीला ‘पॉज ॲड्स’ फीचर जाहिरातदारांसाठी सादर करण्यात आले होते. नंतर हे फीचर अनेक प्रेक्षकांनी स्वीकारले; ज्यामुळे कंपनीने जागतिक स्तरावर रोल आउट सुरू केले. पण, ‘पॉज जाहिरात’ म्हणजे नेमके काय आणि ते युजर्सचा अनुभव कसा अपग्रेड करू शकते? तर, ‘पॉज जाहिराती’ हे फीचर युजर्सच्या आवडी-निवडीला प्राधान्ये देतात, युजर्स ॲक्टिव्ह आहेत की इनॲटिव्ह आहेत हेसुद्धा समजून घेतात.
याव्यतिरिक्त यूट्यूबने दावा केला आहे की, हे नवीन फीचर तुम्हाला ‘कमी व्यत्यय आणणारा’ अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे. काही वर्षांपासून YouTube ‘अनस्किपेबल ॲड्स’ आणण्याचा सातत्याने सतत प्रयत्न करीत आहे. ब्रॅण्डेड QR कोडपासून ते अगदी पिक्चर-इन-पिक्चर जाहिरातींपर्यंत YouTube ने या समस्येवर अनेक उपाय शोधून काढले. त्यामुळे ‘पॉज ॲड्स’ ही या प्रयोगांमधील नवीन भर आहे, असे आपण म्हणू शकतो.
पण, यातसुद्धा एक ट्विस्ट आहे. जर तुम्हाला या फीचरचा उपयोग करायचा असेल, तर तुम्हाला यूट्यूब प्रीमियम घ्यावे लागेल. आतापर्यंत ‘पॉज जाहिराती’ फक्त यूट्यूब प्रीमियम युजर्ससाठी उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त भारतातील यूट्यूब प्रीमियमच्या वैयक्तिक प्लॅनची किंमत १४९ रुपये आहे आणि कौटुंबिक प्लॅनची किंमत प्रतिमहिना २९९ रुपये आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्हाला प्रतिमहिना ८९ रुपयांमध्ये हा प्लॅन मिळेल. तसेच जर तुम्ही नवीन युजर्स असाल, तर तुम्हाला YouTube Premium काही दिवसांसाठी मोफत मिळू शकेल. १,४९० रुपयांचा वार्षिक वैयक्तिक प्लॅन, ४५९ रुपयांचा क्वार्टली प्लॅन व १५९ रुपयांचा मासिक प्रीपेड प्लॅन, असे प्रीपेड पर्याय युजर्ससाठीदेखील आहेत. तुम्ही या प्रीमियम योजना तीन महिने किंवा एक महिन्यासाठी मिळवू शकता.