सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वाप[आर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. युट्युब सध्या एका नवीन टूल ची चाचणी करत आहे. जे क्रिएटर्सना AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून आपले व्हिडीओ ऑटोमॅटिक डब करण्यास मदत करेल. कंपनीने गुरूवारी VidCon येथे याबद्दलची घोषणा केली. युट्युबने AI संचालित डबिंग सेवा Aloud बरोबर एकत्रितपणे काम केले जे Google च्या इन-हाऊस इनक्यूबेटर एरिया १२० चा भाग आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला युट्युबने अनेक भाषांमध्ये ऑडिओ ट्रॅकला समर्थन केले होते. जे क्रिएटर्सना त्यांच्या नवीन आणि आधीपासून असलेल्या व्हिडिओमध्ये डबिंग जोडण्याची परवानगी देते. ज्यमुळे क्रिएटर्सना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. जून २०२३ पर्यंत क्रिएटर्सनी ७० पेक्षा जास्त भाषांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त व्हिडीओ डब केले आहेत. याबाबतचे वृत्त techcrunch ने दिले आहे.
पूर्वी क्रिएटर्सना त्यांचे ऑडिओ ट्रॅक तयार करण्यासाठी थर्ड पार्टी डबिंग प्रोव्हायडर्सेसशी थेट पार्टनरशिप करावी लागत होती. जी वेळखाऊ आणि महाग अशी प्रक्रिया होती. Aloud त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय व्हिडीओ डब करू देते. गुगलने २०२२ मध्ये सर्वात प्रथम Aloud सादर केले. AI आधारित डबिंग प्रॉडक्ट किएटर्ससाठी व्हिडीओला ट्रांसस्क्रिप्ट करते. त्यानंतर भाषांतर करते आणि डब केलेले व्हर्जन तयार करते. Aloud द्वारे डब तयार करण्याआधी क्रिएटर्स ट्रान्सक्रिप्शनचे पुनरावलोकन आणि एडिट करू शकतात.
युट्युबचे क्रिएटर प्रॉडक्टचे उपाध्यक्ष अमजद हनिफ यांनी सांगितले, ”युट्युब शेकडो क्रिएटर्ससह टूल चे टेस्टिंग करत आहे. कंपनी लवकरच या टूलला सर्व क्रिएटर्ससाठी सुरू करेल. Aloud सध्या इंग्रजी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेमध्ये उपलब्ध आहे. तथापि भविष्यात त्यामध्ये हिंदी आणि बहासा इंडोनेशियन यांसारख्या भाषांचा समावेश केला जाईल.”
अमजद हनिफ पुढे म्हणाले, ”भाषांतरित ऑडिओ ट्रॅक क्रिएटर्सच्या आवाजाप्रमाणे अधिक हावभाव असणारे आणि lip sync करण्यासाठी काम करत आहे.” युट्युबने TechCrunch सांगितले की, भविष्यात AI जनरेटिव्ह Aloud ला आवाज, चांगली भावना आणि लीप रिअॅनिमेशन यांसारखी काही फीचर्स लॉन्च करण्याची परवानगी देईल.