युट्यूब हे लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तींचा कंटेन्ट, व्हिडीओ सहजरित्या उपलब्ध होतात. तसेच कंटेन्ट क्रियेटर्सना देखील त्यांच्या जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचता येते. याच क्रियेटर्सना त्यांच्या फॅन्सशी संवाद साधणे अधिक सोपे व्हावे यासाठी युट्यूबवर एक नवे फीचर रोल आऊट करण्यात आले आहे. काय आहे हे फीचर जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युट्यूबवर ‘लाईव्ह टुगेदर’ हे फीचर नुकतेच रोल आऊट करण्यात आले. या फीचरचा वापर करून क्रियेटर्स आणि त्यांचे फॉलोअर्स एकाचवेळी लाईव्ह करू शकणार आहेत. याआधी ही सुविधा इन्स्टाग्राम लाईव्हवर उपलब्ध होती, आता युट्यूबवरही उपलब्ध झाली आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीला लाईव्ह सुरू असताना त्यात ऍड करता येणार आहे. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

आणखी वाचा : ‘ही’ ट्रिक वापरून पाहा गुपचूप Whatsapp Status; स्टेट्स ठेवणाऱ्या व्यक्तीलाही दिसणार नाही नाव

युट्यूबवरील ‘लाईव्ह टुगेदर हे फीचर वापरण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • तुमच्या स्मार्टफोनवर युट्यूब उघडा.
  • क्रिएट आणि ‘गो लाईव्ह’ हे पर्याय एकत्र निवडा.
  • थंबनेल, सब्जेक्ट, लाईव्ह कोण पाहू शकत अशी माहिती तिथे भरा.
  • त्यानंतर ओके पर्याय निवडुन तुम्ही ही लिंक लाईव्हसाठी आमंत्रित करू इच्छिनाऱ्या व्यक्तींना शेअर करू शकता.

सध्या हे फीचर फक्त अँड्रॉइड फोन्ससाठी उपलब्ध आहे, पण लवकरच डेस्कटॉपसाठीही हे उपलब्ध होणार आहे. तसेच सध्या हे फीचर निवडक कंटेन्ट क्रिएटर्ससाठी उपलब्ध आहे आणि लवकरच आणखी क्रिएटर्सना यात जोडण्यात येणार आहे, अशी माहिती युट्यूबने ब्लॉगमध्ये दिली आहे.