YouTube Shorts introduce 3 minute videos : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब ॲप युजर्सना आकर्षित करतात. फोटो पोस्ट करणे, स्टोरीवर गाणे लावणे, रील पाहणे, लाइव्ह जाणे आदी बरीच फीचर्स युजर्ससाठी या ॲप्सवर उपलब्ध असतात. तसेच इन्स्टाग्रामवरचे रील फीचर हळूहळू फेबसबुक व ट्विटरवरसुद्धा सुरू झाले. पण, इन्स्टाग्रामव्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर एक मिनिटापेक्षा जास्त मोठी रील अपलोड करता येत नव्हती. पण, आता यूट्यूब इन्फ्लुएन्सर, कन्टेन्ट क्रिएटरसाठी खास काहीतरी घेऊन आले आहे.

यूट्यूब त्यांच्या शॉर्ट्स (YouTube Shorts) फीचरवर एक खास अपडेट आणत आहे; जे क्रिएटर्सना तीन मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी देईल. १५ ऑक्टोबर २०२४ पासून हा बदल अमलात येईल. त्यामुळे युजर्सचा YouTube Shorts वर कन्टेंट तयार करण्याचा आणि तो वापरण्याचा अनुभव बदलणार आहे. कारण- सुरुवातीला युजर्स ६० सेकंदांच्या व्हिडीओवर लक्ष केंद्रित करीत होते; पण नवीन अपडेटमध्ये तीन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करण्याचा अनोखा अनुभव युजर्सना घेता येणार आहे.

आधी युजर्स यूट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) लहान आणि फास्ट व्हिडीओवर लक्ष केंद्रित करीत होते, जे साधारणपणे एक मिनिटाच्या आत असायचे. या लहान व्हिडीओंमुळे यूट्यूबला TikTok आणि Instagram Reels सारख्या इतर प्लॅटफॉर्म्ससोबत स्पर्धा करण्यात मदत झाली. पण, आता यूट्यूब लाँग व्हिडीओला सपोर्ट करणार आहे; तसेच या व्हिडीओमुळे पूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओवर परिणाम होणार नाही आणि यूट्यूब युजर्सच्या आवडीनुसार त्यांना लॉँग शॉर्ट्स शोधण्यास मदत होईल.

हेही वाचा…Meta AI : अ‍ॅप डाउनलोड करून स्टोरेज करू नका फूल; WhatsApp वरच करा आता फोटो एडिट

यूट्यूबवरील कन्टेंट शॉर्ट्समध्ये मिक्स करता येईल

याचबरोबर व्हिडीओची लेन्थ वाढविण्याव्यतिरिक्त, कन्टेंट क्रिएटर रील्स मनोरंजक, आकर्षक बनविण्यासाठी YouTube टेम्पलेट्स वापरू शकतात. या फीचरद्वारे युजर्सना शॉर्ट्सवरील ‘रिमिक्स’ बटण टॅप करून, ‘हे टेम्पलेट वापरा’ निवडून, ट्रेंडिंग व्हिडीओ सहजपणे रीमिक्स किंवा पुन्हा तयार करण्यास अनुमती मिळवू शकतात. यामुळे क्रिएटर्सच्या ट्रेंडिंग लोकप्रिय कन्टेंटमध्ये वैयक्तिक स्पर्श जोडण्याचे काम आणखीन सोपे होईल.

आगामी महिन्यात आणखी एक अपडेट येणार आहे, ज्यामध्ये यूट्यूबवरील कन्टेंट शॉर्ट्समध्ये मिक्स केले जाईल. कन्टेंट क्रिएटर्सना लवकरच विविध यूट्यूब व्हिडीओंमधून म्युजिक व्हिडीओंसह क्लिप्स वापरण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते त्यांचे शॉर्ट्स (YouTube Shorts) अधिक आकर्षक बनवू शकतील. या फीचरमुळे क्रिएटर्सना अधिक क्रिएटिव्हिटी दाखविता येईल आणि यूट्यूबशी जोडण्याची संधी मिळेल. तसेच, Google DeepMind चा प्रगत व्हिडीओ मॉडेल, Veo हे या वर्षीच्या अखेरीस शॉर्ट्समध्ये समाविष्ट केले जाणार आहेत, जे क्रिएटर्सना अधिक पॉवरफुल व्हिडीओ बॅकग्राऊंड, स्टॅण्डअलोन क्लिप ऑफर करील. तर असे बदल येत्या काळात यूट्यूब शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसून येतील.