तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. YouTube Shorts आता नवीन भन्नाट फीचर युजर्सच्या भेटीला आणणार आहे. हे फिचर रिमिक्स व्हिडीओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना खूपच उपयोगाचं ठरणार आहे. अगदी टिकटॉकप्रमाणे हे फिचर असून यात काही नियम लागू केले आहेत जे निर्मात्यांना YouTube प्लॅटफॉर्मवरून अब्जावधी व्हिडीओंच्या क्लिपचा वापर करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रीमिक्स टूल या नवीन फिचरचा आणखी विस्तार करत निर्मात्यांना त्यांच्या स्वतःच्या YouTube शॉर्ट पोस्टमध्ये इतर व्हिडीओंमधल्या ऑडिओचा नमुना वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे. “आपल्या ऑडिओ लायब्ररीतील संगीतामध्ये मिक्स करण्यासाठी किंवा संपूर्ण YouTube व्हिडींओंमधून मूळ ऑडिओ वापरण्यासाठी आमचे शॉर्ट्स क्रिएशन टूल वापरून तुमचे स्वतःचे छोटे व्हिडीओ तयार करा,” अशी माहिती कंपनीने एका अपडेटमध्ये दिली आहे.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच

TikTok टूल ‘स्टिच’ प्रमाणेच YouTube शॉर्टचे नवे फीचर
YouTube शॉर्ट्सचे नवे फिचर लोकप्रिय TikTok टूल ‘स्टिच’ सारखे आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘सँपल ऑडिओसह तुम्ही तयार केलेल्या शॉर्ट्सचे श्रेय स्त्रोत निर्मात्याच्या मूळ व्हिडीओला दिले जाणार आहे. YouTube च्या संगीत भागीदारांकडून कॉपीराइट सामग्री असलेले संगीत व्हिडीओ रीमिक्सिंगसाठी वापरता येत नाहीत.’

आणखी वाचा: आता तुम्ही ‘लास्ट सीन’ स्टेटस लपवू शकता, WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे

यापुढे आणखी माहिती देत असताना कंपनीने पुढे स्पष्ट केले की, “तुम्ही इतरत्र बनवलेला छोटा व्हिडीओ अपलोड केल्यास, तुम्ही वापरत असलेली कॉपीराइट-संरक्षित सामग्री YouTube वर तुमच्या वापरासाठी मंजूर असल्याची खात्री करा.” कंपनीने असे सुचवले आहे की कॉपीराइट असलेले म्यूझिक वापरल्याने तुमच्यावर Content ID दावा होऊ शकतो.

१ ते ५ सेकंद क्लिप वापरण्यास परवानगी
नवीन अपडेट निर्मात्यांना लाँग-फॉर्म व्हिडीओंमधून १ ते ५ सेकंदाचे सेक्शनमध्ये क्लिप करण्याची अनुमती देईल. “शॉर्ट्स YouTube वर सॅम्पलिंगसाठी आपोआप निवडले जातात आणि तुम्ही त्यांची निवड रद्द करू शकत नाही. तुमच्या चॅनेलवरील लॉंग फॉरमॅट व्हिडीओंसाठी, तुम्ही YouTube स्टुडिओमध्ये ऑडिओ सॅम्पलिंग मर्यादित करू शकता,” असं देखील कंपनीने म्हटले आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने असेही म्हटले आहे की, YouTube शॉर्ट्स आता वेब आणि टॅबलेटद्वारे उपलब्ध आहे.

Story img Loader