YouTube Testing Play Something Floating Action Button : यूट्यूब (YouTube) हे सर्वोत्कृष्ट व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. इथे एखादे गाणे ऐकणे, एखादा चित्रपट, मालिका, लहान मुलांसाठी आवडती गाणी, गोष्टी ऐकणे व पाहणे अगदी सहज सोपे जाते. पण, कधी कधी तुम्हाला योग्य व्हिडीओ किंवा तुम्हाला पाहिजे तसा व्हिडीओ शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर, या स्क्रोलिंग समस्यांचा अंत करण्यासाठी, यूट्यूब नवीन ‘प्ले समथिंग’ (Play something) फ्लोटिंग ॲक्शन बटणाची चाचणी करीत आहे.

प्ले समथिंग

9to5Google च्या अलीकडील अहवालानुसार, नवीन ‘Play something’ बटण काळ्या पार्श्वभूमीसह आणि तळाच्या पट्टीच्या अगदी वर पांढऱ्या मजकुरासह दिसते. या बटणावर टॅप केल्याने शॉर्ट्स प्लेअरमधील एखादा व्हिडीओ प्ले होईल. हे फीचर युजर्सना त्याच्या अनुभवावर आधारित नवीन व्हिडीओही दाखवेल. उदाहरणार्थ- जर एखाद्या युजरला रोमँटिक गाणी पाहणे आवडत असेल, तर हे फीचर त्याला तसा कन्टेन्ट पोहोचवण्यात मदत करील. पण, असे दिसून आले की, प्लेअरच्या तळाशी असलेल्या टाइमलाइन स्क्रबरसह स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या लाइक, डीसलाइक, कमेंट्स आणि शेअर बटणासह बटण पोर्ट्रेट मोडमध्ये नियमित कन्टेन्टसुद्धा प्ले करू शकते.पण, जेव्हा मिनी प्लेअर ॲक्टिव्ह असतो तेव्हा ‘प्ले समथिंग’ बटण अदृश्य होते.

Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Marathi actor Mahesh Kothare Dance in sukh mhanje nakki kay asta serial success party
Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सक्सेस पार्टीत महेश कोठारेंचा ‘झपाटलेला’ चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

हेही वाचा…आता WhatsApp तुमचा स्कॅनर! महत्त्वाची कागदपत्रे झटक्यात करून देईल स्कॅन; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

यूट्यूबने (YouTube) ‘प्ले समथिंग फीचर’चा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये एका Reddit युजर्सने “काय पाहायचे ते ठरवू शकत नाही?” असा मजकूर लिहिलेला बॅनर आणि तळाशी ‘प्ले समथिंग बटण’ दिसणारा एक फोटोसुद्धा शेअर केला होता. नवीन ‘Play something’ बटण सर्व युजर्ससाठी केव्हा आणले जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे. पण, २०२४ वर्षाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यूट्यूबमध्ये ते नवीन सुधारणा आणि फीचर्सचा एक समूह घेऊन येणार आहेत. त्यात प्लेलिस्टसाठी लघु प्रतिमा सेट करण्याची क्षमता (thumbnails for playlists), स्लीप टायमर सेट करणे, मिनी प्लेअर पुन्हा डिझाइन करणे आदी अनेक गोष्टी असणार आहेत.

Story img Loader