व्हिडीओ स्ट्रीमिंह प्लॅटफॉर्म यूट्यूबवर व्हिडीओ पाहणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ६ एप्रिलपासून युजर्सची युट्युबवर दिसणाऱ्या जाहिरातींपासून सुटका होणार आहे. कंपनीने प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन बदल करत असल्याचे सांगितले आहे. यानुसार आता युट्यूब प्लॅटफॉर्मवरील ओव्हरले अ‍ॅड्स काढून टाकल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर हा बदल ६ एप्रिलपासून लागू होईल. कंपनीने आपल्या यूट्यूब सपोर्ट पेजवर त्याची माहिती शेअर केली आहे. पण युजर्सना व्हिडीओ पाहताना बॅनर किंवा शॉर्ट अ‍ॅड्सचा त्रास सहन करावा लागणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे नवीन फीचर फक्त यूट्यूब डेस्कटॉप व्हर्जनवर लागू होईल. त्यामुळे मोबाईल अ‍ॅप युजर्सना सध्यातरी या फीचरचा फायदा घेता येणार नाही.

Uber ने लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त फीचर; ९० दिवस आधीच करता येणार बुकिंग, जाणून घ्या सविस्तर

ओव्हरले अ‍ॅड्स व्हिडीओच्या टॉप किंवा बॉटमवर दिसतात. ज्या व्हिडिओसोबतचं दिसत असतात. व्हिडीओ प्ले करताना या अ‍ॅड्सची अडचण होत नाही. मोबाईलवर अशा अ‍ॅड्स खूप क्वचित दाखविल्या जातात.

या अ‍ॅड्स तुम्ही क्रॉस बटणावर क्लिक करूनही काढून टाकू शकता. पण या अ‍ॅड्स हटवताना खूप कंटाळा येतो. कारण बऱ्याचदा क्रॉसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थेट त्या अ‍ॅड्सच्या पेजवर घेऊन जाते, त्यामुळे व्हिडीओ पाहण्याची मजा निघून जाते.

YouTube वर इतर कोणत्या प्रकारच्या Ads आहेत?

डिस्ल्पे अ‍ॅड्स : या अ‍ॅड्स डेस्कटॉपवरील विशिष्ट व्हिडिओच्या उजवीकडे आणि फोन तसेच डेस्कटॉपवरील शिफारस केलेल्या व्हिडिओंच्यावर दिसतात. या अ‍ॅड्समुळे व्हिडिओ पाहण्यात कोणताही अडचण येत नाही.

स्किपेबल व्हिडिओ अ‍ॅड्स : या अ‍ॅड्स मेन व्हिडिओच्या आधी किंवा त्या दरम्यान प्ले होतात. युजर्स 5 सेकंदांनंतर त्या स्कीप करू शकतात.

नॉन स्कीपेबल व्हिडिओ अ‍ॅड्स : या अ‍ॅड्स मेन व्हिडिओच्या आधी पूर्ण पाहाव्या लागतात. साधारणपणे 15-30 सेकंदांपर्यंत या अ‍ॅड्स असतात.

बंपर अ‍ॅड्स : या अ‍ॅड्स स्कीप करण्यायोग्य नसतात, परंतु त्यांची सरासरी लांबी सुमारे 6 सेकंद असते.

स्पॉन्सर कार्ड : व्हिडिओच्यादरम्यान मध्येच एखाद्या प्रोडक्टची माहिती या अ‍ॅड्समधून दिसते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtube will stop showing overlay ads on desktop from 6 april sjr
Show comments