तरुण मंडळींसाठी यूट्युब हा एक खास प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही विविध ठिकाणांची माहिती तर शोधू शकताच. तसेच इथे तुम्ही स्वतःचे यूट्युब चॅनेल सुरू करून, अनेकांचे मनोरंजनही करू शकता. तुमचे ज्ञान, कला आदी इतरांपर्यंत पोहचवू शकता. आता यूट्युब वापरकर्त्यांसाठी कंपनी नवीन फीचर आणि काही खास संधी घेऊन येत आहे. भारतातील क्रिएटर्ससाठी ही एक खास संधी असणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने क्रिएटर्स यूट्युबवर अधिक सहजपणे त्यांचा ब्रॅण्डेड कन्टेन्ट सोशल मीडियावर पोस्ट करू शकतात.

यूट्युबने (YouTube) युजर्स आणि क्रिएटर्ससाठी दोन खास फीचर्स लाँच केली आहे. एक तर प्रॉडकास्ट आणि दुसरे म्हणजे ब्रॅण्डेड कन्टेन्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉडकास्ट कसे असेल ते जाणून घेऊ. तुमची मते मांडणे, स्टोरी शेअर करणे आदी अनेक गोष्टी प्रॉडकास्टच्या माध्यमातून शेअर करणे हा एक लोकप्रिय मार्ग आहे. पण, आता क्रिएटर्ससाठी त्यांचे प्रॉडकास्ट त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कन्टेन्टसाठी पैसे मिळवले सोपे होईल. यूट्युबकडून यूट्युब स्टुडिओमध्ये (Youtube Studio) नवीन फीचर आणण्यात येणार आहे; ज्यामुळे क्रिएटर्सना त्यांचे पॉडकास्ट यूट्युब आणि यूट्युब म्युझिकवर सहज प्रकाशित करता येणार आहेत. तसेच त्यांना यूट्युब म्युझिक मुख्यपृष्ठावरील Podcast shelves देखील फायदा होऊ शकतो; जे युजर्सना क्रिएटरचे पॉडकास्ट शोधण्यात आणि त्यात व्यग्र ठेवण्यास मदत करील. यूट्युब म्युझिकवरील क्रिएटर्सचे प्रॉडकास्ट आता ऑन डिमांड, ऑफलाइन आणि बॅकग्राऊंडमधील गोष्ट ऐकण्यासाठीही उपलब्ध असतील. याचा अर्थ पॉडकास्टर यूट्युब प्लॅटफॉर्मवरील जाहिराती आणि सदस्यतांमधून अधिक कमाई करू शकतात.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं

हेही वाचा…आता WhatsApp वर सहज शोधले जाणार जुने मेसेज; युजर्ससाठी लाँच होणार ‘कॅलेंडर फीचर’

क्रिएटर्ससाठी पैसे कमावण्याचे सोपे मार्ग :

क्रिएटर्सना त्यांच्या कन्टेन्टमधून पैसे कमावण्याचे आणि त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचे इतर मार्गदेखील यूट्युब ऑफर करते. त्यापैकी एक ‘फॅन फंडिंग’ आहे; जे लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चॅनेल मेंबरशिप किंवा सुपर चॅटद्वारे निर्मात्यांना त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची संधी देते. तसेच डिसेंबर २०२० मध्ये फॅन फंडिंग उत्पादनांमधून बहुतांश कमाई करणार्‍या चॅनेल्सच्या संख्येत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने भारतात फॅन फंडिंग वाढत आहे.

ब्रॅण्डेड कन्टेन्टद्वारे पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पेड पार्टनरशिप. म्हणजेच जेव्हा क्रिएटर कन्टेन्ट तयार करतात आणि ब्रॅण्ड व एजन्सीजसह पार्टनरशिप करतात. मग क्रिएटर्सना त्याच्या बदल्यात पैसे मिळतात. तर यूट्युबने एक ब्रॅण्डेड कन्टेन्ट प्लॅटफॉर्म फीचर लाँच केले आहे; ज्यात क्रिएटर-जाहिरातदार यांची पार्टनरशिप कंपनीच्या प्रमोशनसाठीसुद्धा फायदेशीर ठरेल. आता ब्रॅण्डेड कन्टेन्ट भारतातील क्रिएटर आणि निवडक जाहिरातदारांसाठी उपलब्ध आहे. क्रिएटर त्यांच्या खास आणि ब्रॅण्डेड कन्टेन्टसाठी परफेक्ट जाहिरातदार शोधू शकणार आहेत.