देशातील आघाडीच्या फुड डिलिव्हरी कंपन्यांपैकी एक झोमॅटोने विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी नवीन उपाय केला आहे. झोमॅटोने त्याचे अॅप हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषा जसे, गुजराती, कन्नड, बंगाली, मल्याळम, पंजाबी, मराठी, तामिळ आणि तेलुगूमध्ये उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीनुसार, प्रादेशिक भाषेतील अॅपमुळे झोमॅटो आता प्रत्येक महिन्याला १ लाख ५० हजार ऑर्डर्स पूर्ण करत आहे. सध्या ऑर्डर्समध्ये हिंदीचा वाटा ५४ टक्के आणि तामिळचा वाटा 11 टक्के असून उर्वरित वेगाने वाढत आहेत, असे झोमॅटोने सांगितले. सध्या देशातील १ हजार शहरांमध्ये झोमॅटोचे वापरकर्ते आहेत.
(मोठी बातमी! ५४ लाख TWITTER युजर्सचा डेटा लीक; डेटामध्ये ‘ही’ माहिती)
सकारात्मक भावनेबद्दल कृतज्ज्ञ असताना आम्ही नुकतीच सुरुवात केली असल्याचे आम्ही ओळखतो. आमचे प्रादेशिक अॅप अधिक अचूक आणि संदर्भात्मक बनवण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत काम करू, अशी भावना झोमॅटोने व्यक्त केली आहे.
दरम्यान कंपनीतील ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. कर्मचाऱ्यांची कपात ही त्यांच्या कामगिरीवर आधारित असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे. २०२० मध्ये कंपनीने १३ टक्के नोकर कपात केली होती. कोरोना महामारीमुळे व्यवसायात घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली होती.