भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून (ISRO) एका महत्वपूर्ण मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. इस्रोसोबतच संपूर्ण भारताचं स्वप्न असलेलं चांद्रयान -३ आता काही क्षणातच अंतराळात झेपावणार आहे. हा प्रक्षेपण कार्यक्रम तुम्ही घरी बसूनही पाहू शकाल. जर तुम्हाला लाँच इव्हेंट पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर जावे लागेल. चांद्रयान लाँच करण्यापूर्वी फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने इस्रोच्या अधिकाऱ्यांसाठी खास डिश पाठवली आहे. चला तर पाहूया काय आहे ते खास डिश…तत्पूर्वी जाणून घ्या मिशनचे उद्दिष्ट काय..?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिशनचे उद्दिष्ट

आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी इस्रोच चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने प्रस्थान करेल. चांद्रयान-२ मोहिमेत जी उद्दिष्टय होती, तेच चांद्रयान-३ मिशनच लक्ष्य असणार आहे. इस्रोच्या भविष्यातील आंतरग्रह मोहिमांसाठी चांद्रयान-३ ची खूप मदत होऊ शकते. चांद्रयान ३ द्वारे लँडर आणि रोव्हर चंद्रावर जाणार आहे. त्यातून चंद्राबद्दलची बरीच माहिती आपल्याला मिळेल. 

(हे ही वाचा : Chandrayaan-3: चंद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी इस्रोकडून खास व्यवस्था; ‘या’ ठिकाणी करावी लागेल नोंदणी )

झोमॅटोने पाठवली ISRO ला ‘ही’ खास डिश

झोमॅटो कंपनीचे एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक, आईची भूमिका साकारत झोमॅटोने मिशनच्या यशाबद्दल सांगितले आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक आई आपल्या मुलाला परीक्षेसाठी किंवा कोणत्याही गंतव्यस्थानावर जाण्यापूर्वी दही आणि साखर खाऊ घालते, त्याचप्रमाणे Zomato ने ISRO अधिकाऱ्यांना त्यांच्या मेहनतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कंपनीने ट्विट केले आणि लिहिले की, ते इस्रोसाठी दही-साखर पाठवत आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

देशभरातून शुभेच्छा

आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. इस्रोच्या संपूर्ण टीमला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato has sent curd sugar for isro currently this tweet is going viral on social media and people are giving different reactions pdb
Show comments