Zomato ही फूड डिलिव्हरी कंपनी आहे. यावरून आपण घरातून, ऑफिसमधून कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन फूड ऑर्डर करू शकतो. आपल्या हव्या असणाऱ्या हॉटेलमधून आपल्या जे खायचे आहे ते आपण यावरून ऑर्डर करू शकतो. आता याच झोमॅटो कंपनीने आपली नवीन UPI सर्व्हिस लॉन्च केली आहे.
झोमॅटो या ओनलाईन फूड डिलिव्हर करणाऱ्या कंपनी UPI सर्व्हिस लॉन्च करण्यासाठी ICICI बँकेसह भागीदारी केली आहे. UPI सेवेच्या माध्यमातून ग्राहकांच्या पेमेंट करण्याचा अनुभव आणखी चांगला करण्याचा प्रयत्न आहे असे कंपनीने सांगितले. झोमॅटोवरून UPI पेमेंट करताना वापरकर्त्यांना KYC करण्याची आवश्यकता नाही.
हेही वाचा : Google चा मोठा निर्णय! ‘ही’ अकाउंट्स होणार डिलीट, जाणून घ्या यात तुमचा समावेश नाही ना?
Zomato UPI सर्व्हिस
झोमॅटो कंपनी UPI लॉन्च करून लोकांचे पेमेंट करण्याचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही झोमॅटो App द्वारे सहजपणे पेमेंट करू शकणार आहेत. पण हे करण्यासाठी तुम्हाला कोणतेही बँक अकाउंट सेव्ह करून नवीन UPI आयडी तयार करावा लागेल. जे वापरकर्ते पेमेंट करण्यासाठी Google Pay, Paytm किंवा PhonePe सारखे UPI प्लॅटफॉर्म वापरत आहेत त्यांना नवीन UPI आयडी तयार करण्याची गरज नाही.
Zomato UPI कसे अॅक्टिव्हेट करायचे?
१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या डिव्हाइसवर झोमॅटो App उघडावे.
२. त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाइल सेक्शनवर क्लिक करा.
३. खाली स्क्रोल केले असता तुम्हाला Zomato UPI हा पर्याय
दिसेल.
४. त्यानंतर अॅक्टिव्हेट झोमॅटो युपीआयवर क्लिक करावे व एखादा यूपीआय आयडी तयार टायर करून सेट करावा.
५. झोमॅटो युपीआय अॅक्टिव्हेट केल्यांनतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा वागणार आहे.
६. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट लिंक करावे लागेल.