सध्या भारतात reliance jio, airtel आणि vi या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र काही कारणांमुळे vi ला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. आता भारतात अजून एक कंपनी आले नेटवर्क सुरु करू शकते. नक्की ही कंपनी कोणती आहे व हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेब कॉन्फरन्स कंपनी झूम व्हिडिओ कम्युनिकेशनला पॅन इंडिया टेलिकॉम लायसन्स मिळाले आहे. यासह, झूमसाठी Jio, Airtel आणि Vi नंतर चौथी टेलिकॉम कंपनी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झूमची मूळ कंपनी ZVC ने सांगितले, ”लायसन्स मिळाल्यानंतर झूम लवकरच आपल्या ग्राहकांना आणि एंटरप्राइझ ग्राहकांना टेलिफोन सेवा प्रदान करेल.” अमेरिकेमधील झूम कंपनी आपल्या ग्राहकांना वेबसाईट आणि App द्वारे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा प्रदान करते.

हेही वाचा : AI मुळे वाढतोय धोका? व्हाईट हाऊसमध्ये दिग्गज टेक कंपन्यांच्या सीईओंची होणार बैठक, जो बायडेन म्हणाले…

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे , ”झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्सच्या युनिट जेव्हीसी इंडियाला दूरसंचार विभागाकडून पॅन इंडिया टेलिकॉम लायसन्स मिळाले आहे.” या लायसन्समुळे कंपनी आपली क्लाउड आधारित प्रायव्हेट ब्रँच एक्सचेंज (PBX) सेवा – झूम फोन – बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतात कार्यरत असलेल्या इतर संस्थांना ऑफर करण्यास सक्षम असणार आहे.

JVC महाव्यवस्थापक आणि प्रमुख (भारत आणि सार्क प्रदेश) समीर राजे म्हणाले, “झूम फोनसह, भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय युनिट्स त्यांचे स्वतःचे काम करू शकतात आणि कर्मचाऱ्यांमध्ये अधिक सहकार्य वाढवू शकतात.” कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये झूम फोनने जागतिक स्तरावर १०० टक्के वाढ मिळवली होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zoom video conference app zvc gets telecom pan india license vi jio and airtel tmb 01