अद्ययावत फिचर्स देण्याच्या चढाओढीत स्मार्टफोन कंपन्या आता स्मार्टफोन युजर्समध्ये असलेल्या सेल्फीच्या क्रेझचा पण विचार करू लागले आहेत. इनफोकस या स्मार्टफोन निर्मिती कंपनीने एम ६८० हा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल केला असून, हा फोन सेल्फीप्रेमींसाठी उपयुक्त ठरणारा आहे. कारण, ‘एम ६८०’ या स्मार्टफोनचे दोन्ही(फ्रंट आणि रिअर) कॅमेरे १३ मेगापिक्सलचे देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेराने टिपलेले छायाचित्र देखील चांगल्या गुणवत्तेचे असावे याउद्देशाने या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा जास्त मेगापिक्सलचा देण्यावर कंपनीने भर दिला. इनफोकस ‘एम ६८०’ हा स्मार्टफोनची स्क्रीन ५.५ इंचांची असून, त्यात ४ जी कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील वापरता येईल. तर १.५ गिगाहट्सचा ऑक्टाकोअर प्रोसेसर आणि २ जीबीची तगडी रॅम मोबाईला देण्यात आली आहे. १०,९९९ रुपये किंमत असलेला हा ‘इनफोकस एम ६८०’ स्मार्टफोन गोल्ड आणि सील्व्हर या दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध होणार आहे. येत्या २१ डिसेंबरपासून या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल सुरू होणार असून, त्यासाठीचे नोंदणीकरण स्नॅपडीलच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2015 रोजी प्रकाशित
सेल्फीप्रेमींसाठी ‘इनफोकस’चा खास फिचर्स असलेला स्मार्टफोन
स्मार्टफोन कंपन्या आता स्मार्टफोन युजर्समध्ये असलेल्या सेल्फीच्या क्रेझचा पण विचार करू लागलेत
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 15-12-2015 at 13:10 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infocus m680 launched for rs 10999 will be snapdeal exclusive