व्हिडिओ आणि फोटोग्राफ्सही !
आता सर्वत्र चर्चा आहे ती, थ्रीडी टीव्हीची. तेही आता बाजारपेठेतच नव्हेत तर अनेकांच्या घरातही चांगले रुळलेले दिसतात. पण आपल्याकडे कमी जाणवते आहे ती, थ्रीडी कंटेंटची. म्हणजेच त्या थ्रीडी टीव्हीवर पाहण्याजोगे आपल्याहाती काही नाही. नाही म्हणायला या थ्रीडी टीव्हीमध्ये सध्या तुम्हाला दिसणारे नेहमीचे कार्यक्रम काहीशा थ्रीडीमध्ये म्हणजेच त्याला थोडाथ्रीडी इफेक्ट देऊन पाहण्याची सोय असते. त्यासाठी त्यात थ्रीडी इफेक्ट देणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर केलेला असतो. पण हे थ्रीडी प्रकरण चालवायचे असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात थ्रीडी शूटिंग करावे लागेल. त्यासाठी वेगळा कॅमेरा वापरावा लागतो. सध्याच्या पारंपरित कॅमेऱ्यामध्ये थ्रीडी शुटिंग करण्याची सोय नसते. त्यासाठी दोन कॅमेरे असलेला खास थ्रीडी शूट कॅमेरा वापरावा लागतो. येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या कॅमेऱ्यांनी बाजारपेठे भरलेली दिसेल. हे भविष्य लात घेऊनच वू कंपनीने आता थ्रीडी व्हिडिओ आणि फोटोग्राफ्सही टिपता येतील, असा डिजिकॅम आता बाजारात आणला आहे. वू थ्रीडी कॅमेरा या नावे तो ओळखला जातो.
यामध्ये केवळ थ्रीडी नव्हे तर थ्रीडी एचडी मूव्ही आणि फोटोग्राफ्स टिपण्याची सोय आहे. या थ्रीडी इमेजिंगसाठी यात दोन लेन्सेस (डीएलडीएस) वापरण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शूट केलेल्या गोष्टी पाहण्यासाठी याला थ्रीडी एलसीडी डिस्प्लेही देण्यात आला आहे. आणि त्यावर थ्रीडीमध्ये पाहण्यासाठी वेगळा थ्रीडी चष्मा लावण्याची गरज भासत नाही. यासाठी १६ मेगापिक्सेलचे दोन सेन्सर्स वापरण्यात आले आहेत. शिवाय एचडीटीव्हीसाठी एचडीएमआय केबल आहेच. या कॅमेऱ्याला ३२ जीबी एसडी कार्डचा स्लॉटही देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १९,९९०/-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा