आपल्या खिशात स्मार्टफोन असतोच. त्याचा वापर आपण आपल्या योग्य त्या गोष्टींसाठी केला तर इतरांना ऐषोरामाची वाटणारी ही गोष्ट आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते आणि त्याचा वापर आपण आपल्या विकासासाठी करू शकतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक अॅप्स अँड्रॉइड स्टोअरवर उपलब्ध आहेत. ज्याचा वापर करून आपण आपल्या महाविद्यालयातील अभ्यासापासून ते व्यवस्थापनापर्यंत अनेक गोष्टी अधिक सोप्या करू शकतो.
* गुगल प्ले बुक्स
तुमच्या अभ्यासाची अनेक पुस्तके महाग असतात. ही सर्व पुस्तके सर्वानाच विकत घ्यायला जमतात असे नाही. अशा वेळी तुम्ही ग्रंथालयाची मदत घेता. हे ग्रंथालय आता तुमच्या मोबाइलमध्ये उपलब्ध असून तुम्हाला अपेक्षित सर्व पुस्तके गुगल प्ले बुक्स या अॅपवर उपलब्ध होऊ शकतात. या अॅपमध्ये पुस्तक भाडय़ावर मिळते. हे भाडे अगदी मोजके असून ते पुस्तक तुम्हाला १८० दिवसांसाठी वापरता येऊ शकते. ही पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे चांगली बॅटरी लाइफ असलेला फोन असणे आवश्यक आहे. तसेच ती सेव्ह करण्यासाठी जागा असणेही आवश्यक आहे. ही पुस्तके सेव्ह करण्यासाठी जागा तुलनेने जास्त लागते. ही पुस्तके वाचण्यासाठी मोबाइलमध्ये पीडीएफ रीडर असणेही आवश्यक आहे.
हे अॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.
अभ्यास खिशात!
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक अॅप्स अँड्रॉइड स्टोअरवर उपलब्ध आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-11-2013 at 06:52 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Android apps for study