आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ‘आयफोन ५ एस’च्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत ‘आयफोन ५ एस’ची किंमत २२ हजारांपर्यंत खाली आली आहे. सप्टेंबर महिन्यात हीच किंमत ४५ हजारांच्या घरात होती. मात्र, आयफोनचा लेटेस्ट मॉडेल ‘आयफोन ६ एस’ आणि ‘६ एस प्लस’च्या मागणीत दिवाळीनंतर घट झाल्याने कंपनीने आपली विक्री वाढविण्यासाठी ‘आयफोन ५ एस’च्या दरात घट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत ‘आयफोन ५ एस’ची किंमत निम्म्यावर आली आहे. तर, इतर देशांत ती याहूनही कमी आहे. ‘आयफोन ५ एस’ (१६ जीबी) हा फोन भारतात इन्फीबीम या संकेतस्थळावर २१, ८९९ रुपयांत मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone 5s is starting at rs 21899 online