पाहा एचडी आणि वाचाही
अलीकडे टॅब विकत घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. स्मार्ट फोन आणि टॅब्लेट असा पर्याय दिला तर अनेक जण टॅब्लेटचा पर्याय स्वीकारताना दिसतात. काहींनी तर स्मार्टफोन टाळून थेट कॉलिंग टॅब म्हणजेच सिम कार्ड स्लॉट असलेला टॅब्लेट घेण्याला पसंती दिली आहे. अर्थात टॅब्लेटच्या माध्यमातून तुम्ही हाय- डेफिनेशन (एचडी) चित्रपट पाहण्याचा आनंद लुटू शकता. त्याचवेळेस मोबाईलप्रमाणे संवादासाठी, गाणी ऐकण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे इ- बुक्स वाचण्यासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. अनेकांनी तर केवळ इ- बुक्ससाठी टॅब्लेटला पसंती दिलेली दिसते. सॅमसंग किंवा अ‍ॅपलसारख्या बडय़ा ब्रॅण्डेड कंपन्यांच्या किंमतीही तेवढय़ाच अधिक असतात त्यामुळेच अनेकांनी आता मध्यम आकाराच्या ब्रॅण्डेड कंपन्यांकडे आपला मोहरा वळविला आहे. या कंपन्यांमध्ये अलीकडे ग्राहकांची पसंती लाभलेली महत्त्वाची कंपनी म्हणजे बार्नेस अ‍ॅण्ड नोबेल्स.
कंपनीने बाजारात आणलेल्या नूक एचडी प्लस या टॅब्लेटची सध्या बाजारात चलती आहे. या नऊ इंची टॅब्लेटचे वजन केवळ ५१५ ग्रॅम्स एवढेच असून त्याची जाडी ११.४ मिमी. आहे. १९२० ७ १२८० रिझोल्युशनचा हा स्क्रीन पूर्णपणे हाय- डेफिनेशन आहे. त्याचा स्क्रीन पूर्णपणे लॅमिनेशन केलेला असून त्यामुळे तो चकाकत नाही आणि त्यामुळे वाचन व्यवस्थित करता येते किंवा चित्रपट पाहातानाही कोणतही व्यत्यय येत नाही.
नूक एचडी प्लसचा प्रोसेसर १.५ गिगाहर्टझ् क्षमतेचा असून तो डय़ुएल कोअर असल्याने वेगात काम करतो. सध्या लोकप्रिय असलेले सर्व प्रकारचे मल्टिमीडिया फॉर्मॅटस् यामध्ये वापरले जाऊ शकतात. १६ जीबी आणि ३२ जीबी अशा दोन क्षमतांमध्ये तो उपलब्ध असून नूक क्लाऊडची सुविधाही त्या सोबत देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : सुमारे रु. १५,०००/-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा