‘बीबीएम’चं पूर्वीपासूनचं आकर्षण या झटपट प्रगतीमागचं एक कारण म्हणून सांगितलं जात आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ‘बीबीएम’ हा अन्य कोणत्या मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनपेक्षा अधिक सुरक्षित आणि गोपनीय अ‍ॅप्लिकेशन आहे. ‘बीबीएम’वर कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्यापूर्वी त्याची संमती मिळणे आवश्यक असते. याउलट व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य अ‍ॅप्समध्ये ग्रुपवरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी थेट बोलता येते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर गप्पाटप्पा किंवा मित्रमंडळींसोबत टाइमपास करण्यासाठी होतो आहे, तर त्याच वेळी कार्यालयीन चच्रेसाठी किंवा गोपनीय संवादासाठी ‘बीबीएम’ला पसंती दिली जात आहे.

Story img Loader